Prajwal Revanna Sex Scandal Sarkarnama
देश

Revanna Sex Scandal : प्रज्वल रेवण्णाच्या सेक्स स्कँडलमध्ये धक्कादायक खुलासा; आईला सगळं माहीत होतं... ड्रायव्हरनेच केली पोलखोल

Bhavani Revanna's Alleged Involvement : प्रज्वल रेवण्णा सेक्स स्कँडल प्रकरणाची सुनावणी बेंगलुरूतील एका कोर्टात सुरू आहे. सुनावणीदरम्यान त्याचा ड्रायव्हर एन. कार्तिक याची साक्ष नोंदविण्यात आली.

Rajanand More

देशाचे माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांचे नातू व माजी खासदार प्रज्वल रेवण्णा यांच्या सेक्स स्कॅंडलबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. प्रज्वलच्या या स्कँडलची माहिती त्याच्या आईलाही होती. याबाबत प्रज्वलच्या ड्रायव्हरनेच कोर्टात ही माहिती दिली आहे. तसेच स्कँललमधील अश्लील फोटो व व्हिडीओ कसे व्हायरल झाले, याची खुलासाही त्याने केला आहे.

प्रज्वल रेवण्णा सेक्स स्कँडल प्रकरणाची सुनावणी बेंगलुरूतील एका कोर्टात सुरू आहे. सुनावणीदरम्यान त्याचा ड्रायव्हर एन. कार्तिक याची साक्ष नोंदविण्यात आली. त्याने सांगितले की, आपला मुलगा अनेक महिलांशी शारीरिक संबंध ठेवतो आणि त्याचे व्हिडीओ फोनमध्ये रेकॉर्ड करत असल्याची माहिती त्याची आई भवानी रेवण्णा यांना होती.

प्रज्वल खासदार असताना त्याच्या मोबाईलमध्ये तब्बल दोन हजारांहून अधिक अश्लील फोटो आणि जवळपास 40 व्हिडीओ होते. याबाबत त्याच्या आईला सांगितले होते. पण सुरूवातीला त्यांना विश्वास बसला नाही. त्यानंतर त्यांना हे फोटो व व्हिडीओ दाखविले होते. त्यांनी आपल्याला याबाबत गप्प राहण्यास सांगितल्याची माहिती कार्तिकने कोर्टात दिली आहे.

भवानी रेवण्णा यांनी प्रज्वलला समजावून सांगण्याचा प्रयत्नही केला होता. त्यानंतर प्रज्वल दोन महिने आईशी बोलत नव्हता. भवानी यांना फोटो कुणी दाखविले, याची माहिती त्याला हवी होते. भवानी यांनी याबाबत माहिती दिल्यानंतर आपल्यावर प्रज्वल भडकल्याचे कार्तिक यांने सांगितले.

कार्तिकनेच प्रज्वलच्या मोबाईलमधून सर्व व्हिडीओ आणि फोटो घेतल्याची कबुलीही कोर्टात दिली. त्याने सांगितले की, एकदा प्रज्वल हा आपला मोबाईल कारमध्येच ठेवून मैत्रिणीच्या घरी गेला होता. आपल्याला मोबाईलचा पासवर्ड माहीत होता. फोन टेक केल्यानंतर त्यात अनेक व्हिडीओ आणि फोटो होते. पक्षाचे कार्यकर्ते, घरातील नोकर आणि इतरांचाही त्यात समावेश होता. हे सर्व फोटो व व्हिडीओ आपल्या मोबाईलमध्ये घेतल्याची माहिती कार्तिकने कोर्टात दिली.  

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT