Prashant Kishor
Prashant Kishor Sarkarnama
देश

Prashant Kishor News : प्रशांत किशोर यांचा भाजपवर गंभीर आरोप, 'अवघ्या 30-35 जागांसाठी भविष्याशी खेळले'

Roshan More

BJP News : भाजप बहुमताने पुन्हा सत्तेत येणार असल्याची भविष्यवाणी राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी केली आहे. त्यांच्या या अंदाजाबाबत त्यांच्यावर टीका देखील केली जात आहे.

भाजपचा (BJP) जागा घटणार नसल्याचे प्रशांत किशोर (Prashant Kishor) ठामपणे सांगत आहेत. मात्र, भाजपच्या विजयाची खात्री दिल्यानंतरही प्रशांत किशोर यांनी भाजपवर गंभीर आरोप केला आहे.

बिहारच्या भविष्यासाठी प्रशांत किशोर Prashant kishor यांनी जनसुराज पदयात्रा काढली होती. मीडियाशी बोलताना प्रशांत किशोर म्हणाले, भाजपला 2020 मध्ये नितीशकुमार यांच्या पक्षापेक्षा अधिक जागा मिळाल्या होता. नितीशकुमार यांच्या पक्षाला अवघ्या 42 जागा मिळाल्या होत्या. मात्र, त्यांनी हे राज्य नितीशकुमार यांच्या हवाली केले.

भाजपला नितीशकुमार (Nitish Kumar) यांच्या विषयी प्रेम होते म्हणून त्यांनी असे केले नाही. तर बिहारमधून 30 ते 35 खासदार निवडून आणण्यासाठी असे केले. भाजप बिहारच्या भविष्यासोबत खेळला. बिहारच्या लोकांसोबत काय होईल? याची भाजपाला अजिबात चिंता नाही, असा गंभीर आरोप प्रशांत किशोर यांनी केला.

जनसुराज पदयात्रा काढून प्रशांत किशोर यांनी बिहार पालथा घातला. लालुप्रसाद यादव, तेजस्वी यादव यांच्यावर त्यांनी आपल्या पदयात्रेत टीका केली होती. मात्र, नितीशकुमार यांना कधीकाही साथ देणाऱ्या नितीशकुमार (Nitish Kumar) यांना देखील टार्गेट केले होते. निवडणुकीचा रणनीतीकार निवडणुकीच्या मैदानात उतरणार का? याची सर्वांना उत्सुकता होती. मात्र, प्रशांत किशोर यांनी बिहारमध्ये निवडणूक लढली नाही.

राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

भाजपचा पलटवार

बिहारच्या भविष्यासोबत भाजप खेळला, या प्रशांत किशोर यांच्या आरोपाला भाजपने देखील चोख प्रत्युत्तर दिले आहे. प्रशांत किशोर यांना भाजप आणि नितीशकुमार यांचे सरकार येण्याआधीची स्थिती माहित नाही. बिहारमध्ये जंगलराज होते. ते संपवण्याचे काम आपल्या सरकारने केल्याचा दावा भाजप नेत्यांनी केला आहे. बिहारचे भविष्य लक्ष्यात घेतच भाजपने नितीशकुमार यांना साथ दिल्याचे भाजप नेते मनोज शर्मा म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT