Loksabha Election 2024 : महाराष्ट्रात घटलेल्या जागा भाजप 'या' राज्यांमधून मिळवणार? असा आहे 'मेगा प्लॅन'

BJP News : भाजपला महाराष्ट्रासोबत कर्नाटक, बिहार राज्यामध्ये 2019 प्रमाणे यश मिळणार नसल्याचे राजकीय विश्लेषक सांगत आहेत. महाराष्ट्रात होणारे नुकसान भरून काढण्याचे भाजपचे टार्गेट आहे.
BJP News
BJP NewsSarkarnama
Published on
Updated on

BJP Political News : महाराष्ट्रातील लोकसभेच्या 48 जागांवर काय निकाल लागणार, याकडे देशाचे लक्ष आहे. भाजपला 2019 प्रमाणे पुन्हा येथे यश मिळणार नसल्याचे सांगितले जात आहे. भाजपने 400 पारचा नारा दिला असला तरी त्यात महाराष्ट्राची मोठी साथ नसेल त्यामुळे महाराष्ट्रात होणारे नुकसान दुसऱ्या राज्यांमध्ये भरून काढण्यात भाजपने (BJP) लक्ष केंद्रीत केले आहे. त्यामध्ये पाच राज्य आघाडीवर आहेत.

भाजपला महाराष्ट्रा बरोबर कर्नाटक, बिहार राज्यामध्ये 2019 प्रमाणे यश मिळणार नसल्याचे राजकीय विश्लेषक सांगत आहेत. त्यामुळे तेलगंणा आंध्रप्रदेश, पश्चिम बंगाल, ओडिशा, उत्तर प्रदेश Uttar Pradesh या राज्यांवर भाजपने विशेष लक्ष केंद्रीत केले आहे. या राज्यांमधून महाराष्ट्रात होणारे नुकसान भरून काढण्याचे भाजपचे टार्गेट आहे.

BJP News
Rakesh Tikait News: भाजपला पराभूत करण्यासाठी टिकैत यांची रणनीती; शेतकऱ्यांना केलं आवाहन

तेलंगणामध्ये 10 जागा मिळणार?

दक्षिण भारतात भाजपला कर्नाटक वगळता कोणत्याही राज्यात मोठे यश मिळालेले नाही. मात्र, तेलंगणामध्ये भाजपने BJP लोकसभा निवडणूकीत चांगली कामगिरी केल्याचे भाजप नेते सांगतात. तेलंगणातील 17 जागांपैकी भाजप 10 जागा जिंकणार असल्याचा दावा भाजप नेते, गृहमंत्री अमित शाह Amit Shah यांनी केला आहे.

आंध्र प्रदेशात यश मिळेल

आंध्र प्रदेशात भाजप सहा जागांवर लढत आहे. चंद्रबाबू नायडू यांच्या टीडीपीसोबत भाजप ही निवडणूक लढत आहे. मात्र, टीडीपी आणि भाजप मिळून येथे 15 जागा जिंकले, असा आत्मविश्वास भाजपचे नेते व्यक्त करत आहेत. भाजपला तीन ते चार जागांवर यश मिळेल, असा दावा देखील भाजप नेत्यांकडून करण्यात येतो आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

उत्तर प्रदेशाकडे लक्ष

उत्तर प्रदेशातील 80 जागांपैकी 75 जागांवर भाजप निवडणूक लढत आहे. तर पाच जागांवर त्यांचे मित्रपक्ष लढत आहेत. 2019 च्या निवडणुकीत भाजपने उत्तर प्रदेशामध्ये 62 जागा जिंकल्या होत्या. यावेळी भाजपने येथे 70 पेक्षा अधिक जागा जिंकण्याचा दावा केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह हे येथे लक्ष ठेवून आहेत. मुख्यमंत्री आदित्यनाथ यांची उत्तर प्रदेशामध्ये वाढती लोकप्रियतेचा देखील भाजपला मोठा फायदा होईल, असा अंदाज भाजप नेत्यांचा आहे. त्यामुळे येथे भाजपला मोठे यश मिळण्याचा दावा करण्यात येतो आहे.

BJP News
Uddhav Thackeray On Modi Guarantee : उद्धव ठाकरेंनी सांगितला मोदी गॅरंटींचा अर्थ, म्हणाले...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com