Prashant Kishor Sarakarnama
देश

Prashant Kishor and Lalu Yadav : लालूंचा वर्षानुवर्षांचा 'MY' फॉर्म्युला, प्रशांत किशोर 'M' कार्ड चालवून फोल ठरवणार?

Prashant Kishor and Bihar Vidhan Sabha : प्रशांत किशोर यांनी २ ऑक्टोबर २०२२ रोजी आपले जन सुराज अभियान सुरू केले होते, जे अद्यापही काही जिल्ह्यांमध्ये सुरू आहे.

Mayur Ratnaparkhe

Bihar Assembly Election News : निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी पुढील वर्षात होणाऱ्या बिहार विधानसभा निवडणुकीत ४० मुस्लीम उमेदवारांना मैदानात उतरण्याची घोषणा केली आहे. याकडे जन सुराज पक्षाचे संयोजक प्रशांत किशोर यांची राजदच्या मुस्लिम-यादव(MY)मतपेटीला सुरुंग लावण्यासाठी विचारपूर्वक केलेली खेळी म्हणून बघितलं जात आहे.

ही मोठी घोषणा रविवारी दुपारी पाटणा येथील बापू सभागृहात मुस्लीम समुदायाच्या गर्दीसमोरच केली गेली. या कार्यक्रमास मुस्लीम समुदायाचे ७ हजारांहून अधिक लोक उपस्थित होते. याकडे मुस्लीम समुदायात प्रशांत किशोर यांची असलेली ताकद दाखण्याचा प्रयत्न म्हणूनही पाहिले जात आहे.

प्रशांत किशोर(Prashant Kishor) यांनी हेही म्हटले की, २ ऑक्टोबर रोजी जेव्हा ते आपल्या पक्षाचा अधिकृतरित्या शुभारंभ करतील, तेव्हा त्यामध्ये मुस्लीम समुदायामधून किमान चार-पाच जणांचे प्रतिनिधित्व असेल. त्यांच्या कोअर टीमचे सदस्य २५ असतील. त्यांनी हेदीखील घोषणा केली आहे की, त्यांच्या पक्षाला राज्यभरातून एक कोटींपेक्षा अधिक समर्थनासह लॉन्च केले जाईल.

बिहारमध्ये(Bihar) पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत ४० मुस्लीम उमेदवार उतरवण्याची मोठी घोषणा म्हणजे आरजेडीला नुकसान पोहचवण्याचे प्रशांत किशोर यांचे स्पष्ट संकेत आहेत. आऱजेडीची कोअर व्होट बँक ही साडेतीन दशकांपेक्षाही अधिक काळापासून मुस्लीम आणि यादव राहिले आहेत. एवढचं नाहीतर प्रशांत किशोर यांनी हेही जाहीर केलं आहे की, त्यांचा पक्ष निवडणुकीत सर्व मुस्लीम उमेदवारांचा खर्च उचलेल.

ती मुस्लीम आणि यादव व्होट बँकच होती, ज्याच्या बळावर राजदे सर्वेसर्वा लालू प्रसाद यादव आणि त्यांची पत्नी राबडी देवी यांनी १९९० ते २००५ दरम्यान १५ वर्षे सत्ता चालवली. प्रशांत किशोर यांनी हेही स्पष्ट केले आहे की, २ ऑक्टोबर रोजी जेव्हा त्यांची पार्टी लॉन्च होईल, तेव्हा त्यामध्ये किमान १८ लाख मुस्लीम सदस्य असतील. प्रशांत किशोर यांनी २ ऑक्टोबर २०२२ रोजी आपले जन सुराज अभियान सुरू केले होते. त्यांनी बिहारमध्ये व्यापकप्रमाणात जन सुराज यात्रा काढली, जी अद्यापही काही जिल्ह्यांमध्ये सुरू आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT