Prashant Kishor Prediction on Five Assembly elections Sarkarnama
देश

Prashant Kishor News : पाच राज्यांच्या निवडणुकींबाबत प्रशांत किशोर यांचा अंदाज; कोण मारणार बाजी ?

Chetan Zadpe

Delhi News : पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीपूर्वी काही राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका पार पडणार आहेत. या निवडणुका आगामी लोकसभेची दिशा ठरवणार असल्याने सर्वच राजकीय पक्षांनी यासाठी आता कंबर कसली आहे. दरम्यान, आताच्या राजकीय परिस्थितीमध्ये देशात दोन राजकीय आघाड्यांची पुन्हा एकदा बांधणी झाली आहे.

काँग्रेसप्रणित इंडिया आघाडी आणि भाजपप्रणित एनडीए आघाडीत ही लोकसभेची सेमिफायनल रंगणार आहे. वर्षअखेरीस राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगण आणि मिजोराम या पाच राज्यांच्या निवडणुकांमध्ये दोन्ही आघाडींची कसोटी लागणार आहे. (Latest Marathi News)

दरम्यान, लोकसभा निवडणुकांच्या दिशा ठरवणाऱ्या या महत्त्वपूर्ण विधानसभांच्या निकालांबाबत निवडणूक रणनीतिकार आणि 'जन सुराज' नावाचा स्वतंत्र राजकीय पक्ष काढणारे प्रशांत किशोर यांनी भाष्य केले आहे. या विधानसभा निवडणुकांमध्ये कोण बाजी मारणार? कुणाला कितपत यश मिळणार ? याबाबत किशोर यांनी काही अंदाज वर्तवले आहे.

प्रशांत किशोर म्हणाले, "राजस्थानमध्ये भाजप-काँग्रेस अशा थेट लढतीमध्ये भाजप थोडी पुढे वाटत आहे. पण मागील काही महिन्यांत काँग्रेसने इथे आपली पकड मजबूत केली आहे. तरी भाजप थोडीशी पुढे आहे. मध्य प्रदेशात भाजप आणि काँग्रेसमध्ये अटी-तटीची लढत होईल. पण काही प्रमाणात भाजपला इथे फायदा होण्याचा अंदाज आहे. "

"मागच्या वेळी छत्तीसगडमध्ये मोठे यश मिळवलेल्या काँग्रेससमोर भाजपची तगडी लढत असणार आहे. पण तरीही इथे काँग्रेस पुढे आहे. तेलंगणमध्ये बीआरएस विजय मिळवेल” असा अंदाज प्रशांत किशोर यांनी वर्तविला आहे.

(Edited By - Chetan Zadpe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT