MLA Disqualification News : शिवसेना आमदार अपात्रतेबाबत तारीख अन् वेळ ठरली; एकाच दिवशी होणार सुनावणी

Maharashtra Politics : अपात्रतेच्या कार्यवाहीपासून वाचण्यासाठी युक्तिवाद करावा लागणार आहे.
MLA Disqualification News :
MLA Disqualification News :Sarkarnama

Mumbai News : राज्याच्या राजकारणातून एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. शिवसेनेतील ठाकरे आणि शिंदे गटातील आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी 14 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. 14 सप्टेंबरला दुपारी बारा वाजता विधिमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात सुनावणीला सुरुवात होणार आहे. तसेच, एकाच दिवशी तब्बल ३४ याचिकांवर विधानसभा अध्यक्ष सर्व आमदारांची सुनावणी घेणार असल्याचे सांगितले जात आहे.

वादी व प्रतिवादी आमदारांना पुरावे सादर करत म्हणणं मांडण्याची संधी दिली जाईल. तसेच, प्रत्येक याचिकेची वेगळी सुनावणी केली जाणार असून, त्या संबंधित आमदारांना बोलावले जाईल. विधानसभा अध्यक्षांकडे आलेल्या याचिकेच्या सुनावणीवेळी आमदारांना आपलं म्हणणं मांडायला संधी दिली जाईल.

MLA Disqualification News :
Prithviraj Chavan News : पश्चिम महाराष्ट्रातल्या मराठ्यांनी काय घोडे मारले? आरक्षणावरून पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्र्यांवर संतापले..

सुनावणीसाठी शिवसेनेच्या दोन्ही गटांना नोटीस बजावण्यात आली आहे. शिवसेनेच्या 40 तर ठाकरे गटाच्या 14 आमदारांना नार्वेकरांनी नोटीस बजावली होती. या सुनावणीत दोन्ही गटांच्या आमदारांना सर्व पुरावे सादर करण्यासह अपात्रतेच्या कार्यवाहीपासून वाचण्यासाठी युक्तिवादही करावा लागणार आहे.

शिवसेनेतील बंडखोर आमदार अपात्रता प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयात प्रदीर्घ सुनावणी पार पडली. दोन्ही बाजूंच्या वतीने ताकदीच्या वकिलांनी युक्तिवाद केले. या प्रकरणाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले होते. न्यायालयाने दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर आमदार अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षांवर सोपवला. त्यामुळे आता १४ सप्टेंबरला राहुल नार्वेकर काय निर्णय घेतात, याबाबत उत्सुकता आहे.

Edited By- Anuradha Dhawade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com