नवी दिल्ली : राष्ट्रपिता महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांच्या ‘अबाईड विथ मी’ (Abide with me) या आवडत्या प्रार्थनेचे सूर यंदाच्या बिटिंग रिट्रीट कार्यक्रमात ऐकायला मिळणार नाहीत. प्रजासत्ताक दिनानंतर (Republic Day) तीन दिवसांनी म्हणजे २९ जानेवारीला होणाऱ्या राष्ट्रपतींच्या अंगरक्षकांच्या पलटणीला निरोप देण्याच्या ‘बिटिंग द रिट्रीट’ कार्यक्रमासाठी निश्चित केलेल्या सुरावटींमधून गांधीजींच्या पसंतीच्या प्रार्थनेचे सूर वगळण्यात आल्याने नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
मूळचे स्कॉटिश असलेल्या एंग्लिकन हेन्री फ्रान्सिस लाईट यांनी ‘अबाईड विथ मी’ हे १९ व्या शतकात तयार केलेले भजन असून त्याला विल्यम हेन्री माँक यांनी लावलेली चाल गांधीजींना सर्वाधिक आवडत असे. आतापर्यंत गांधीजींच्या पुण्यतिथीच्या (३० जानेवारी) एक दिवसआधी होणाऱ्या ‘बिटिंग द रिट्रीट’ कार्यक्रमाचा समारोप या सुरावटीने होत आला आहे. १९५० पासून दरवर्षी या प्रार्थनेची सुरावट कार्यक्रमात वाजविली जाते असे. याआधी २०२० मध्ये ‘अबाईड विथ मी’ प्रार्थनेची सुरावट ‘बिटिंग रिट्रीट’मधून हटविण्यात आली होती. परंतु त्यावरून वाद झाल्यानंतर मागील वर्षी पुन्हा कार्यक्रमात या सुरावटीचा समावेश करण्यात आला होता. यंदा आणखी ती एकदा वगळण्याचा प्रकार झाल्यामुळे वाद वाढण्याची चिन्हे आहेत.
अशी आहे मूळ प्रार्थना
Abide with me, fast falls the eventide
The darkness deepens Lord, with me abide
When other helpers fail and comforts flee
Help of the helpless, oh, abide with me
Swift to its close ebbs out life's little day
Earth's joys grow dim, its glories pass away
Change and decay in all around I see
O Thou who changest not, abide with me
I fear no foe, with Thee at hand to bless
Ills have no weight, and tears no bitterness
Where is death's sting?
Where, grave, thy victory?
I triumph still, if Thou abide with me
Hold Thou Thy cross before my closing eyes
Shine through the gloom and point me to the skies
Heaven's morning breaks, and earth's vain shadows flee
In life, in death, o Lord, abide with me
Abide with me, abide with me
‘सारे जहाँ से अच्छा’ने समारोप
‘बिटिंग रिट्रीट’ कार्यक्रमाची सुरवात फनफेअर गाण्याने होईल. ‘मास बॅंड’तर्फे यानंतर वीर सैनिक गीत तर ‘पाईप्सं अॅंड ड्रम्स बॅंड’तर्फे सहा सुरावटी सादर केल्या जातील. केंद्रीय सशस्त्र पोलिस दल, हवाई दल, नौदल, लष्कर या तिन्ही सेनादलांच्या बॅंड तर्फेही सुरेल सुरावटी सादर केल्या जातील. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या ‘आझाद हिंद फौजे’चे गीत ‘कदम कदम बढाये जा’, ‘ऐ मेरे वतन के लोगो’ या गीतांचे सादरीकरण होणार असून ‘सारे जहॉँ से अच्छा’ या गीताने समारोप होईल. या कार्यक्रमात ४४ बिगुल वादक, १६ ट्रम्पेट वादक आणि ७५ ड्रमर्स सहभागी होणार आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.