Liz Truss Resigns
Liz Truss Resigns sarkarnama
देश

Liz Truss Resigns : ब्रिटनमध्ये राजकीय संकट; पंतप्रधान लिझ ट्रस यांचा 45 दिवसातच राजीनामा

सरकारनामा ब्यूरो

Liz Truss Resigns : ब्रिटनच्या पंतप्रधान लिझ ट्रस यांनी तडकाफडकी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. केवळ दीड महिन्याच्या कालावधीत 45 दिवसांत त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. लिझ ट्रस या ब्रिटनच्या इतिहासातील सर्वात कमी कालावधी लाभलेल्या पंतप्रधान ठरल्या.

लिझ ट्रस (Liz Truss) सरकारच्या मिनी बजेटनंतर देशभरात कर रचनेवरुन मोठा गोंधळ झाला होता. या बजेटवरून ब्रिटनच्या अर्थमंत्र्यांना व पंतप्रधान लिझ ट्रस यांच्या विरोधात देशात संतापाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे त्यांना पंतप्रधानांचा राजीनामा द्यावा लागला होता. लिझ ट्रस यांनी मांडलेल्या मिनी बजेटला त्यांच्याच पक्षाच्या खासदारांनी विरोध केला होता. ऋषी सुनक (Rishi Sunak) यांनीही त्यांच्याविरोधात मोर्चा उघडला होता.

ज्या गोष्टीसाठी मला बहुमत मिळाले ती गोष्ट मी पूर्ण करु शकले नाही, अशी प्रतिक्रिया ट्रस यांनी दिली. राजीनामा द्यायच्या एक दिवसापूर्वी लिझ ट्रस यांनी माध्यमांशी संवाद साधला होता. त्यावेळी त्या म्हणाल्या होत्या, मी लढेन, पळ काढणारी नाही. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्यांनी राजीनामा दिला.

लिझ ट्रस यांना त्यांच्या आर्थिक धोरणांमळे राजीनामा द्यायची वेळ आल्याचे राजकीय तज्ज्ञांनी सांगितले आहे. त्यांनी जी काही आर्थिक धोरणे राबवली त्यामुळे ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेवर नकारात्मक परिणाम झाला. ब्रिटनचे चलन पाऊंडच्या किंमतीमध्ये मोठी घसरण झाली होती.

ब्रिटनमध्ये (Britain) वाढता टॅक्स व महागाई याच्याविरोधात आवाज उठवून त्या निवडून आल्या होत्या. महागाईने त्रस्त असलेल्या नागरिकांना त्यांच्यापासून मोठ्या अपेक्षा होत्या. मात्र, लिझ ट्रस यांना केवळ 45 दिवसात राजीनामा द्यावा लागला. गेल्याच आठवड्यात त्यांच्या मंत्रिमंडळातील दोन मंत्र्यांनी राजीनामे दिले होते. 6 सप्टेंबर 2022 ला त्यांनी ऋषी सुनक यांचा पराभव करत त्या ब्रिटनच्या पंतप्रधानपदी विराजमान झाल्या होत्या.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT