Narendra Modi and Ratan Tata : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी सकाळी सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. मोदींनी दिवंगत ज्येष्ठ उद्योजक रतन टाटा यांचे स्मरण करत त्यांच्यावर एक ब्लॉग लिहिला आहे. मोदींनी लिहिले की, रतन टाटा यांना शेवटचा निरोप देवून जवळपास एक महिना उलटला आहे. भारतीय उद्योग जगतातील त्यांचे योगदान सदैव आठवले जाईल आणि हे सर्वच देशवासीयांना प्रेरणा देत राहील.
मोदी(Narendra Modi) म्हणाले की, रतन टाटा यांच्या निधनाला एक महिना होत आहे. मागील महिन्यात आजच्याच दिवशी जेव्हा मला त्यांच्या निधनाबाबत समजले, तेव्हा मी त्यावेळी आसियान समिटसाठी निघण्याच्या तयारीत होतो. रतन टाटा यांचे आपल्यापासून दूर जाण्याचे वेदना आजही मनात आहे. हे दु:ख विसरणे सोपं नाही. रतन टाटांच्या रूपाने भारतने आपला एक महान सुपुत्र एक अमूल्य रत्न गमावले आहे.
पंतप्रधान मोदींनी आपल्या ब्लॉगमध्ये लिहिले की, त्यांच्या नेतृत्वात टाटा समूहा जगभरात सन्मान, प्रामाणिकपणा आणि विश्वासर्हतेचे प्रतीक बनून नवी उंचीवर पोहचला आहे. या व्यतिरिक्त, त्यांनी आपले यश पूर्ण नम्रतेने आणि सहजतेने स्वीकारले. दुसऱ्यांच्या स्वप्नांचे खुलेपणाने समर्थन करणे, दुसऱ्यांची स्वप्न पूर्ण करण्यात मदत करणे हा रतन टाटा यांच्या सर्वात उत्तम गुणांपैकी एक होता.
पंतप्रधान मोदींनी पुढे लिहिले की, रतन टाटा(Ratan Tata) यांनी नेहमीच उत्कृष्ट दर्जाची उत्पादने, उत्कृष्ट दर्जाच्या सेवेवर भर दिला आणि भारतीय उद्योगांना ग्लोबल बेंचमार्क स्थापित करण्याचा मार्ग दाखवला. आज जेव्हा भारत 2047 पर्यंत विकसित होण्याच्या ध्येयाकडे वाटचाल करत आहे, तर आपण ग्लोबल बेंचमार्क स्थापन करत जगभरात आपला झेंडा फडकवू शकतो. रतन टाटा यांचे आयुष्य या गोष्टीची आठवण करून देते की, नेतृत्वाचे मोजमाप केवळ यशाने नाही, तर सर्वात कमकुवत लोकांची देखभाल करण्याच्या त्यांच्या क्षमतेने देखील करता येते.
पंतप्रधान मोदींनी पुढे लिहिले की, वैयक्तिक पातळीवर, मला मागील काही दशकात त्यांना अतिशय जवळून समजण्याचे भाग्य लाभले. आम्ही गुजरातमध्ये एकत्र काम केले. तिथे त्यांच्या कंपनींनी मोठ्याप्रमाणात गुंतवणूक केली. यामध्ये अनेक अशआ योजनांचाही समावेश होता, ज्याबाबत ते अतिशय भावूक होते. जेव्हा मी केंद्रात आलो, तर आमचा घनिष्ठ संवाद सुरू राहिला आणि ते आपल्या राष्ट्र निर्माणाच्या प्रयत्नात एक कटिबद्ध भागीदार बनून राहिले. स्वच्छ भारत मिशन बद्दल रतन टाटा यांचा उत्साह विशेषरित्या माझ्या हृदयाला स्पर्शून गेला होता, ते या जनआंदोलनाचे खंदे समर्थक होते.
पंतप्रधान मोदींनी लिहिले की, कॅन्सरविरोधातील लढाई एक आणखी असे उद्दिष्ट होते, जे त्यांच्या मनाच्या जवळ होते. मला दोन वर्षे पूर्वीचा आसाम मधील तो कार्यक्रम आठवतो, जिथे आम्ही संयुक्तरित्या राज्यात विविध कॅन्सर रूग्णालयांचे उद्घाटन केले होते. आता काही आठवड्यांपूर्वीच मी स्पेन सरकारचे राष्ट्रापती पेड्रो सान्चेज यांच्या सोबत वडोदरा मध्ये होतो आणि आम्ही संयुक्तरित्या एका विमान फॅक्ट्रीचे उद्धाटन केले. या फॅक्ट्रीत सी-295 भारतात बनवले जातील. रतन टाटांनीच यावर काम सुरू केले होते. त्यावेळी मला रतन टाटा यांची उणीव प्रचंड जाणवली.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.