PM Narendra Modi Birthday Sarkarnama
देश

PM Narendra Modi News :'चित्तोडगड'मधून पंतप्रधान मोदींची तोफ धडाडली; राजस्थान विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडला ?

Rajasthan Assembly Election News : " मागील पाच वर्षांमध्ये काँग्रेस सरकारने राजस्थानला उद्ध्वस्त केलं..."

Deepak Kulkarni

Rajasthan Politics : लोकसभा निवडणुका काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. तसेच मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, तेलंगणा, मिझोराम या पाच राज्यांच्या विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. या निवडणुकांकडे लोकसभेची रंगीत तालीम म्हणूनदेखील पाहिले जात आहे. राजस्थानमध्ये काँग्रेसने प्रचारात आघाडी घेतली आहे, तर दुसरीकडे इतके दिवस जरासा बॅकफूटवर गेलेला भाजपही आता अॅक्टिव्ह झाला आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजस्थानच्या विधानसभा निवडणुकीच्या तोंंडावर काँग्रेसच्या गेहलोत सरकारवर टीकेची झोड उठवली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) हे सोमवारी राजस्थान दौऱ्यावर आहेत. विधानसभा निवडणुकीआधीचा हा मोदींचा दौरा राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा मानला जात आहे. त्यांनी चित्तोडगड येथील एका कार्यक्रमात सात हजार कोटींच्या विकासकामांची उद्घाटने केली आहेत. या कार्यक्रमात त्यांनी काँग्रेसच्या गेहलोत सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.

मोदी म्हणाले, मागील पाच वर्षांमध्ये काँग्रेस सरकारने राजस्थानला उद्ध्वस्त केलं. गुन्हेगारीच्या बाबतीत राजस्थान पहिल्या क्रमांकावर आहे, हे पाहिल्यावर अत्यंत वाईट वाटतं. महिलांविरोधातील गुन्ह्यांची, अत्याचारांची सर्वाधिक प्रकरणं राजस्थानमध्येच दिसून येत आहेत. काँग्रेसला तुम्ही यासाठीच मतदान केलं होतं का? असा सवाल उपस्थित करत त्यांनी टीकेची झोड उठवली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, राजस्थान(Rajasthan Assembly Election) हे भारतमाला प्रकल्पांतर्गत सर्वाधिक व्यापार करणारे राज्य आहे. या राज्याचा इतिहास आपल्याला वीरता आणि वैभव एकत्र घेऊन पुढे कसं जायचं ते शिकवतो. आपण त्याप्रमाणे चालायला हवं, असेही मोदींनी सांगितले. या चित्तोडगडच्या कार्यक्रमात मोदींनी राजस्थानचा विकास ही केंद्र सरकारची सर्वोच्च प्राथमिकता असल्याचे जाहीर केले आहे.

" केंद्र सरकार राजस्थानच्या विकासाला प्राधान्य..."

केंद्र सरकार (Central Government) राजस्थानच्या विकासाला प्राधान्य देत आहे.आम्ही राजस्थानमध्ये एक्स्प्रेस हायवे आणि रेल्वेसारख्या आधुनिक पायाभूत सुविधांवर लक्ष केंद्रित केलं आहे. दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वे असो, अथवा अमृतसर-जामनगर एक्स्प्रेस वे असेल, हे मार्ग राजस्थानमधील लॉजिस्टिकशी संबंधित सेक्टरला नवीन शक्ती देतील. काही दिवसांपूर्वी उदयपूर-जयपूर वंदे भारत रेल्वे सुरू झाल्याचेही पंतप्रधान मोदी यांनी या कार्यक्रमात सांगितले.

(Edited By Deepak Kulkarni)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT