India Aghadi Morcha : 'इंडिया' आघाडीचा मोर्चा पोलिसांनी अडवला : वर्षा गायकवाड आक्रमक

Varsha Gaikwad News : गांधी जयंतीनिमित्ताने मुंबईत 'इंडिया' आघाडीच्या वतीने मोर्चा काढण्यात आला.
India Aghadi Morcha
India Aghadi MorchaSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : गांधी जयंतीनिमित्ताने मुंबईत 'इंडिया' आघाडीच्या वतीने मोर्चा काढण्यात आला. इंडिया आघाडीच्या मोर्चासाठी जमलेले कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये या वेळी बाचाबाची झाल्याचे पाहायला मिळाले. काँग्रेस कार्यालय परिसरात जमलेल्या कार्यकर्त्यांना पोलिसांना तेथून बाहेर काढले. त्यामुळे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले. जमावबंदीचे आदेश लागू असल्याचे सांगत पोलिसांनी कार्यकर्त्यांची धरपकड केली.

'इंडिया' आघाडीच्या वतीने मोर्चा काढण्यात आला. मात्र, पोलिसांनी मोर्चा अडवल्यामुळे काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. मोर्चासाठी काँग्रेसच्या (Congress) मुंबई अध्यक्षा वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते सचिन अहिर (Sachin Ahir) उपस्थित होते. पोलिसांनी मोर्चा अडवल्यानंतर गायकवाड चांगल्याच आक्रमक झाल्या. त्यांनी राज्य सरकारवर व केंद्र सरकारवर जोरदार टीका केली.

India Aghadi Morcha
Pawar Ambegaon Sabha : पवारांचा शब्द; 'आंबेगावात लवकरच सभा घेणार, मी अन्‌ खासदार कोल्हे सविस्तर बोलणार'

इंडिया आघाडीच्या वतीने आज पदयात्रा काढण्याची वेळ ठरली होती. ही पदयात्रा मेट्रो सिनेमा, फॅशन स्ट्रीट, हुतात्मा चौक, काळा घोडा, महात्मा गांधी मार्ग, बाळासाहेब ठाकरे पुतळा आणि रिगल सिनेमा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, मादाम कामा रोड मार्ग-कूपरेज, राजीव गांधी पुतळा ते मंत्रालयाजवळील महात्मा गांधी यांचा पुतळा, असा पदयात्रेचा मार्ग होता. महात्मा गांधींच्या पुतळ्याजवळ आघाडीचे नेते आणि कार्यकर्ते वंदन करणार होते.

मात्र, रिगल सिनेमा येथून मोर्चा सुरू करा, असे पोलिसांचे म्हणणे होते. त्यामुळे कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली. त्यानंतर पोलिसांनी काही कार्यकर्त्यांना ताब्यातही घेतले आहे.

Edited by : Amol Jaybhaye

India Aghadi Morcha
Ambedkar on Congress-NCP : साखरपुडा झाला; पण ‘ते’ दोन ‘भटजी’ अडथळे आणत आहेत, त्यामुळे प्रसंगी विनालग्नाचे राहू; पण...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com