New Delhi, 21 February : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन आज (ता. 21 फेब्रुवारी) नवी दिल्लीत विज्ञान भवनात पंतप्रधान नरेंद मोदी यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमाला महाराष्ट्रासह संपूर्ण भारत आणि विदेशातील मराठी साहित्यीक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाचा कार्यक्रमात घडलेल्या एका कृतीची देशभर चर्चा सुरू झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या त्या घटनेमुळे शरद पवार आणि नरेंद्र मोदी यांच्यातील संबंधांना पुन्हा एकदा उजाळा मिळाला आहे.
देश विदेशातील मराठी सारस्वातांच्या उपस्थितीत 98 व्या साहित्य संमेलनाचे मोठ्या देशाच्या राजधानीत मोठ्या दिमाखदार सोहळ्यात उदघाटन झालं. साहित्य संमेलनाचे उद्घाटक हे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) होते, तर स्वागताध्यक्ष ज्येष्ठ नेते शरद पवार होते. हे दोन नेते पुन्हा एकदा एकत्र येत असल्याने त्यांची महाराष्ट्रात आपसूकच चर्चा रंगली होती.
उदघाटनाच्या कार्यक्रमात व्यासपीठावर साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष डॉ तारा भवाळकर, पंतप्रधान नरेंद्र मोदी, शरद पवार (Sharad Pawar), मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आयोजक संजय नहार आदी प्रमुख उपस्थित होते. स्वागताध्यक्ष या नात्याने ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सुरुवातीला भाषण केले. भाषण संपवून शरद पवार हे आपल्या जागेवर बसण्यासाठी येत होते. त्या वेळी खुद्द पंतप्रधान मोदी यांनी पवारांची खुर्ची व्यवस्थित करून त्यांना बसण्यासाठी मदत केली.
भाषण संपल्यानंतर खुर्ची बसलेल्या शरद पवार यांना नरेंद मोदी यांनी स्वतःच्या हातानी बाटलीतील पाणी ग्लासमधून भरून दिले, त्यामुळे या दोन नेत्यांमधील मैत्रीचा तो ओलावा अजूनही कायम असल्याचे दिसून आले. पंतप्रधान मोदी यांनी ती कृती उपस्थितांना भावली आणि त्या कृतीचे उपस्थितांनी टाळ्या वाजवून स्वागत केले.
त्या विधानाची पुन्हा आठवण
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्या पद्धतीने शरद पवार यांचे आदरातिथ्य केले, ते पाहून मोदी यांनी पहिल्या टर्ममध्ये केलेल्या विधानाची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. ‘शरद पवार यांचे बोट धरून मी राजकारणात आलो आहे,’ असे विधान मोदी यांनी केले होते. त्याची आठवण मोदी यांच्या आजच्या वागणुकीमुळे पुन्हा एकदा झाली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.