Sanjay Raut And Sharad Pawar : 'त्या' सत्कारावरून आगपाखड, बोचरी टीका; आता शरद पवार-संजय राऊतांचा दिल्लीत 'सामना'

Thackeray Group Pawar Group Dispute : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी नवी दिल्लीत एकनाथ शिंदे यांचा महादजी शिंदे पुरस्काराने सन्मान केला. या सोहळ्यानंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त केली होती.
Sanjay Raut And Sharad Pawar
Sanjay Raut And Sharad Pawar sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी नवी दिल्लीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा महादजी शिंदे पुरस्काराने सन्मान केला होता. या सन्मानावरून उद्धव ठाकरे यांची शिवसेना चांगलीच आक्रमक झाली होती. खासदार संजय राऊत यांनी तर जाहीरपणे आपली नाराजी बोलून दाखवली होती. याच नाराजीनाट्यानंतर आता जेष्ठ नेते शरद पवार आणि संजय राऊत हे दिल्लीत एका पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमासाठी एकाच व्यासपीठावर एकत्र येणार आहेत. यामुळे सध्या राज्याच्या राजकीय वर्तुळात याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

जेष्ठ पत्रकार नीलेशकुमार कुलकर्णी यांच्या 'संसद भवन ते सेंट्रल विस्टा' या पुस्तकाच्या प्रकाश सोहळ्याच्या निमित्ताने राऊत आणि शरद पवार एकत्र येणार आहेत. यावेळी लोकसभेचे माजी अध्यक्ष शिवराज पाटील चाकूरकर हे कार्यक्रमाचे अध्यक्ष असतील. भारतीय राज्य घटनेला 75 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने नीलेशकुमार यांनी हे पुस्तक लिहलं आहे. या पुस्तकात भारतीय लोकशाहीचा इतिहास आणि वर्तमानाचा आढावा घेण्यात आला आहे.

या पुस्तकाची प्रस्तावणा राऊत यांनी लिहली आहे. तर शरद पवार यांच्यासह लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला, मुख्यमंत्री फडणवीस, माजी लोकसभा अध्यक्ष चाकूरकर, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी पुस्ताकासाठी अभिप्राय लिहला आहे. हा कार्यक्रम संधाकाळी 6 वाजता होणार असून शरद पवार राऊत यांच्या टीकेला उत्तर देताच का? राऊत पवार यांच्याशी काय बोलणार याकडे आत्ता राज्याचे लक्ष लागले आहे.

Sanjay Raut And Sharad Pawar
Sanjay Raut : शिंदेंचा सत्कार ठाकरेंच्या चांगलाच जिव्हारी; आधी टीका,नंतर सारवासारव,पण आता राऊतांकडून पवार ठरवून 'टार्गेट'

काहीच दिवसांपूर्वी दिल्लीत झालेल्या सन्मान सोहळ्यावरून राऊत यांनी टीका केली होती. त्यावेळी त्यांनी शरद पवार यांच्यावर निशाणा साधताना, ज्यांनी महाराष्ट्राची वाट लावली, ज्यांना आम्ही महाराष्ट्राचे शत्रू मानतो, अशा लोकांच्याबरोबरच शरद पवार खुलेआम बसले आहेत. अशा गद्दार लोकांचा सन्मान आपल्या हातून होणे म्हणजे महाराष्ट्राच्या अस्मितेला आणि स्वाभिमानाला धक्का लावणार आहे, अशी आमची भावना असल्याचे त्यांनी म्हटले होते. कदाचित शरद पवार यांची भावना वेगळी असेल, पण महाराष्ट्राच्या जनतेला हे पटलेलं नसल्याचेही म्हटलं होतं.

Sanjay Raut And Sharad Pawar
Sanjay Raut News : 'तेव्हा शिंदेच मुख्यमंत्री होणार होते पण पवारांनी होऊ दिलं नाही, राऊतांचा दावा

तसेच ज्यांनी बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना अमित शाहांच्या आशीर्वादाने तोडली. धनुष्यबाण एकनाथ शिंदे यांच्या हातात दिली. महाराष्ट्र कमजोर केला. अशांना आपण सन्मानित केल्यानं मराठी माणसाच्या हृदयाला नक्कीच वेदना झाल्या. पवारसाहेब, तुमचं दिल्लीतील राजकारण जे काही आहे ते त्यांना माहित. पण आम्हालाही राजकारण कळतं. मात्र आम्हा सर्वांना आणि महाराष्ट्राला या गोष्टीमुळे नक्कीच वेदना झालेल्या आहेत, असेही राऊत यांनी टीका केली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com