PM Narendra Modi  Sarkarnama
देश

PM Narendra Modi Speech : विरोधकांच्या 'इंडिया'वर मोदींचे घाव; ही तर घमेंडी आघाडी...

सरकारनामा ब्यूरो

PM Narendra Modi In Parliament : लोकसभेतून मोदी-शाहांच्या सरकारला बाहेर काढण्यासाठी 'इंडिया' एकवटलेल्या विरोधी नेत्यांच्या आघाडीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) जोरदार घाव घातले. 'नाव बदलून देशावर राज्य करता येत नसल्याचे उघडपणे सांगून मोदींनी 'यूपीए'चे नाव बदलण्याच्या आणि नवे नाव 'इंडिया' ठेवण्याच्या विरोधकांच्या भूमिकेची खिल्ली उडवली. राजकारणासाठी विरोधकांनी 'इंडिया' तोडल्याचा गंभीर आरोप मोदींनी विरोधकांवर केला. ही इंडियाची आघाडी नसून, ती घमेंडी आघाडी असल्याचे मोदींनी आपल्या खास स्टाईलमध्ये विरोधकांना सुनावले.

मी विरोधी पक्षातील माझ्या मित्रांप्रती शोक व्यक्त करू इच्छितो. काही दिवसांपूर्वी तुम्ही मिळून दीड-दोन दशके जुन्या 'यूपीए'वर बंगळुरूमध्ये अंतिमसंस्कार केले. लोकशाही वर्तनानुसार मला सहानुभूती व्यक्त करायची आहे, असा टोला मोदींनी लगावला. विरोधी आघाडीमध्ये अनेक नेते आहेत. त्यातील प्रत्येकाला पंतप्रधान व्हायचे आहे, असा चिमटा मोदींनी काढला.

'विरोधक जुन्या पापांचे काय करणार आहेत, असा सवाल मोदींनी केला. काँग्रेसची (Congress) समस्या अशी आहे की, स्वतःला जिवंत ठेवण्यासाठी 'एनडी'एचा पाठिंबा घ्यावा लागला. पण सवयीनुसार, अभिमानाचा आय त्यांना सोडत नाही. स्वतःला वाचवण्यासाठी विरोधकांनी भारताचे (I.N.D.I.A.) तुकडे केले, असा आरोप मोदींनी केला. बंगळुरूमध्ये विरोधकांच्या झालेल्या बैठकीवरून मोदींनी हल्लाबोल केला.

पश्चिम बंगालमध्ये डावे पक्ष, तृणमूल काँग्रेस (Trinamool Congress) आणि काँग्रेस एकमेकांच्या विरोधात आहेत. तर हेच दिल्लीमध्ये एकत्र आहेत. प्रत्येक राज्यातील विरोधकांची परिस्थिती वेगळी आहे. हे एकत्र राहूच शकत नाहीत, असेही मोदी म्हणाले. भारताच्या प्रगतीचे सत्य जग दुरून पाहत आहे. इथे राहून विरोधकांना ते दिसत नाही. कारण अविश्वास आणि अभिमान या नसांमध्ये स्थिरावला आहे. यासाठी देश काहीही करू शकत नाही, असा शब्दांत मोदींनी विरोधकांवर प्रहार केला.

Edited by : Amol Jaybhaye

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT