Prithviraj Chavan latest news : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी बुधवारी सोशल मीडियात एक पोस्ट करत केंद्र सरकारला अलर्ट केले आहे. त्यांनी फ्रान्समध्ये सध्या सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाची दाहकता सांगतानाच त्यांनी भारतातील विद्यार्थी आंदोलनांकडे सरकारने गांभीर्याने पाहावे, असे सुचविले आहे.
फ्रान्समध्ये सध्या विद्यार्थ्यांचे आंदोलन चांगलेच पेटले आहे. त्याची माहिती देताना चव्हाण यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे की, फ्रान्समधील शेकडो शाळांमधील विद्यार्थी रस्त्यावर आंदोलन करत आहेत. देशातील ४०० हून अधिक उच्च माध्यमिक शाळा बंद असून हजारो विद्यार्थ्यांना ताब्यात गेण्यात आले आहे. आंदोलकांनी काही शाळा पेटवून दिल्या आहेत.
विद्यार्थी आंदोलकांनी शाळांमधील विद्यार्थ्यांची वाढती संख्या आणि त्यातुलनेत शिक्षकांची कमतरता तसेच शाळा इमारतींच्या दुरावस्थेविरोधात आवाज उठविला आहे. हे आंदोलन २१ सप्टेंबरपासून सुरू असून आता त्याचे लोण विद्यापीठांपर्यंत पोहोचले आहे, अशी माहिती चव्हाण यांनी पोस्टमध्ये दिली आहे.
विद्यार्थी आंदोलनामध्ये १७० विद्यार्थी तसेच ६५ कर्मचारीही जखणी झाल्याचे चव्हाण यांनी सांगितले आहे. जवळपास २४ शाळांना आग लावण्यात आली आहे किंवा तोडफोड झाली आहे. उच्च माध्यमिक शाळांपैकी ४०० ते ५०० शाळा बंद आहेत. विद्यार्थी हातात 'Gen Z संतापलेला आहे', 'आमचा संयम सुटत चालला आहे', अशा घोषणा असलेले फलक आहेत, असे चव्हाण यांनी पोस्टमध्ये लिहिले आहे.
फ्रान्समध्ये ता. १७ ऑक्टोबरला मोठ्या आंदोलनाची तयारी सुरू आहे. सरकारने २०२७ च्या अर्थसंकल्पात शिक्षणासाठी केवळ १.७ टक्के निधीच वाढविण्याचे प्रस्तावित केले आहे. ही वाढ महागाई दरापेक्षा कमी आहे, असा दावा चव्हाण यांनी पोस्टमध्ये केला आहे.
फ्रान्समधील आंदोलनाची दाहकता सांगताना चव्हाण यांनी भारत सरकारला सूचक संदेश दिला आहे. आम्हाला गांभीर्याने घ्यावे, एवढीच आमची मागणी असल्याचे फ्रान्समधील विद्यार्थी म्हणत आहेत. अशावेळी भारताने आणि सरकारने, याची दखल घ्यायला हवी, असे चव्हाण म्हणाले आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.