West Bengal name change : पश्चिम बंगालच्या नावात बदल होणार, भाजप सरकारने निश्चित केले नवे नाव; बंग, बांग्ला की बंगाल?

Paschim Banga, West Bengal renamed, Paschim Banga Bill, Shamik Bhattacharya : भाजप सरकारच्या या निर्णयावर तृणमूल काँग्रेसने टीका केली आहे. पक्षाचे नेते कुणाल घोष यांनी राज्याचे नाव 'बांग्ला' असावे, अशी भूमिका माडंली आहे.
West Bengal name change.
West Bengal name change.Sarkarnama
Published on: 
Updated on: 

West Bengal BJP : पश्चिम बंगालच्या नावावरून पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणात नव्याने वाद सुरू झाला आहे. जवळपास २७ वर्षांपासून नामकरणाबाबत सुरू असलेल्या चर्चांना नव्याने उधाण आले आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष शमिक भट्टाचार्य यांनी बुधवारी केलेल्या विधानानंतर जुन्या वाद उफाळून आला आहे.

शमिक भट्टाचार्य यांनी पश्चिम बंगालचे नाव बदलून ते पश्चिम बंग केले जाईल, असे जाहीर केले आहे. राज्याचे नाव बंग किंवा बंगाल नव्हे तर 'पश्चिम बंग' असेच असेल. विधानसभेच्या आगामी अधिवेशनात त्याबाबतचे विधेयक सादर केले जाईल, असेही भट्टाचार्य यांनी स्पष्ट केले आहे. इंग्रजीतही हेच नाव कायम असणार आहे.

राज्याचे नाव बदलण्याची प्रक्रिया लवकरच सुरू होईल, असे संकेत भट्टाचार्य यांनी काही दिवसांपूर्वीच दिले होते. पश्चिम बंगाल, बांग्ला आणि बंगा या नावांवर यापुढे चर्चा होणार नाही. आता पश्चिम बंग हेच नाव असले. राज्याची ऐतिहासिक ओळख नावाशी जोडली जाणार आहे. त्यासाठी विधेयक आणले जाणार असल्याचे भट्टाचार्य यांनी मीडियाशी बोलताना सांगितले.

West Bengal name change.
Shiv Sena symbol case : आमदार अपात्रतेचा निर्णय उलटवला तर..! न्यायमुर्तींचे शिवसेना पक्षचिन्हाच्या निकालाला कलाटणी देणारे गृहीतक

दरम्यान, भाजप सरकारच्या या निर्णयावर तृणमूल काँग्रेसने टीका केली आहे. पक्षाचे नेते कुणाल घोषण यांनी राज्याचे नाव 'बांग्ला' असावे, अशी भूमिका माडंली आहे. पश्चिम बंगाल हे नाव पुन्हा थोपविण्याचा प्रयत्न करू नये. निवडणुकीवेळी 'सोनार बांग्ला' का म्हटले होते. तेव्हा पश्चिम बंगाल म्हटले नव्हते. जर पश्चिम बंगाल आहे, तर पूर्व बंगालही असायला हवे. पण आता तर पूर्व बंगालही अस्तित्वात नाही.

West Bengal name change.
KPSC Chairman Arrest : भीमनवार यांच्या राजीनाम्यासाठी पुण्यात आंदोलन, शेजारच्या राज्यात आयोगाच्या निलंबित अध्यक्षांना अटक

'बांग्ला' हे नाव असेल तर राष्ट्रीय स्तरावर सोयीचे होईल. त्यामुळे ममता बॅनर्जी यांनी तसा प्रस्ताव आणला होता. त्याला कम्युनिस्ट पक्षाने पाठिंबा दिला होता, असे घोष म्हणाले. राज्याचे नाव बदलण्याचा प्रस्ताव १९९९ मध्ये डाव्या आघाडीच्या सरकारनेही आणला होता. त्यावेळी सुरूवातीला पश्चिम बंग हेच नाव निश्चित झाले होते.

त्यानंतर ते बांग्ला करण्याचा प्रस्ताव गेला. पण तत्कालीन केंद्र सरकारने मान्यता दिली नाही. तृणमूल काँग्रेसची सत्ता आल्यानंतर २०१८ मध्ये बांग्ला असा प्रस्ताव आणला होता. पण त्यालाही मंजुरी मिळाली नव्हती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com