Priyanka Gandhi (2).jpg Sarkarnama
देश

Priyanka Gandhi: प्रियांका गांधींनी लोकसभेतलं भाषण थांबवत भाजप खासदाराला फटकारलं; म्हणाल्या,'तुम्ही इतिहास उगाळत...'

Operation Sindoor Debate : पहलगाममधील हल्ल्यावेळी तिथे एकही सुरक्षारक्षक का नव्हता, तिथे सैन्य का तैनात नव्हतं, पहलगाममध्ये जे लोक मारले गेले, त्यांच्यासाठी का सुरक्षा व्यवस्था तैनात नव्हते.,याची संरक्षणमंत्री गृहमंत्री तुम्हाला लाज वाटत नाही का, असा सवालही मोदी सरकारला प्रियंका गांधी यांनी विचारला.

Deepak Kulkarni

New Delhi: संसदेच्या पावसाळी अधिवेशनात पहलगाम हल्ला आणि ऑपरेशन सिंदूरवरुन लोकसभेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये गेल्या काही तासांपासून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहे. वायनाड लोकसभा मतदारसंघाच्या काँग्रेसच्या खासदार काँग्रेसच्या खासदार प्रियांका गांधी(Priyanaka Gandhi) यांनी या चर्चासत्रात आक्रमक भाषण करत मोदी सरकारवर फटकारलं. यावेळी त्यांनी भाजप खासदाराला चांगलंच झापलं.

खासदार प्रियांका गांधी मंगळवारी (ता.29) संसदेत तडाखेबंद भाषण केलं. यावेळी त्यांनी मोदी सरकारवर चांगलेच धारेवर धरले. त्या म्हणाल्या, प्रियांका गांधी यांचं लोकसभेत भाषण सुरू असताना मध्येच भाजप खासदारानं काँग्रेस आणि गांधी घराण्यानं काय केलं असं डिवचलं. त्यावर प्रियांका गांधी यांनी तात्काळ या भाजप खासदाराला 'तुम्ही इतिहास उगाळत बसा, मी वर्तमानात जगणारी आहे',असं खडसावलं.

प्रियांका गांधी म्हणाल्या, मी कालपासून संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि अन्य सत्ताधारी पक्षाच्या खासदारांची भाषणं ऐकली. मात्र, या सगळ्यात मला एक गोष्ट खटकली. संरक्षमंत्री यांनी तर दहशतवाद, राष्ट्रीय सुरक्षा यांच्यासह ऑपरेशन सिंदूर व इतिहासाचे धडेही दिले. पण या सगळ्या भाषणांमधून एक गोष्ट सुटल्याचंही त्यांनी सांगितलं.

प्रियांका गांधींनी पहलगाम हल्ल्यावरून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्यासह राजनाथ सिंह यांच्यावरही टीकेची झोड उठवली. त्या म्हणाल्या,“आपल्याकडे अशी एकही एजन्सी नाही, जिला या हल्ल्याबाबत आधी माहिती मिळाली? पाकिस्तानमध्ये या हल्ल्याची योजना तयार झाली आणि आपल्याला माहितीच नाही? हे आपल्या यंत्रणांचं अपयश नाही का? असा सवालही त्यांनी केला.

पहलगाममध्ये दहशतवादी काय करत होते? केंद्र सरकार प्रचार करत असते की, काश्मीरमध्ये आता शांतता आहे, दहशतवाद संपला आहे. पंतप्रधान सांगतात की,काश्मीरला जा, तिकडे जमिनी खरेदी करा. मग पहलगाममध्ये दहशतवाद हल्ला कसा झाला? असा हल्ला होणार, याची माहिती देणारी एकही यंत्रणा आपल्याकडे नव्हती का?

हे आपल्या यंत्रणांचं अपयश नाही का? हे आपल्या सुरक्षा यंत्रणांचं खूप मोठं अपयश आहे. याची जबाबदारी कोण घेणार? आहे. पहलगाम हल्ल्यानंतर आपल्या देशाच्या आयबी प्रमुखांनी राजीनामा दिला का? गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला का? राजीनामा सोडा, जबाबदारी तरी घेतली का?”, अशी टीकेची झोडही प्रियांका गांधींनी उठवली.

पहलगाममधील हल्ल्यावेळी तिथे एकही सुरक्षारक्षक का नव्हता, तिथे सैन्य का तैनात नव्हतं, पहलगाममध्ये जे लोक मारले गेले, त्यांच्यासाठी का सुरक्षा व्यवस्था तैनात नव्हते.,याची संरक्षणमंत्री गृहमंत्री तुम्हाला लाज वाटत नाही का, असा सवालही मोदी सरकारला प्रियंका गांधी यांनी विचारला. तर टीआरएफबाबत सरकारला माहिती होती. त्यांनी लोकांना मारल्याचीही माहिती होती. मग तुम्ही या गटावर नजर का ठेवली नाही.

पहलगाम हल्ल्याची जबाबदारी टीआरएफनं या दहशतवादी संघटनेनं घेतली. या संघटनेला भारत सरकारनं 2023 मध्ये दहशतवादी संघटना म्हणून घोषित केलं. पण त्याआधी तीन वर्षं ते मोकाटपणे जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादी कारवाया करत होते. एवढंच नव्हे, तर एप्रिल 2020 ते 22 एप्रिल 2025 पर्यंत टीआरपीएफनं भारतात 25 दहशतवादी हल्ल्याचा केल्याचा धक्कादायक दावाही प्रियांका गांधींनी लोकसभेत केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT