Priyanka Gandhi Sarkarnama
देश

Priyanka Gandhi Wayanad : गांधी कुटुंबाला मिळणार तिसरा खासदार; प्रियांका गांधी वायनाडमधून लढणार?

Congress Political News : 'लडकी हूँ, लढ शकती हूँ,' असे उद्गार प्रियांका गांधींनी लोकसभेतील प्रचारात काढले होते.

Sunil Balasaheb Dhumal

Waynad Congress : काँग्रेस नेते राहुल गांधी केरळमधील वायनाड आणि उत्तर प्रदेशातील रायबरेली या दोन्ही लोकसभा मतदारसंघातून तब्बल साडेतीन लाख मतांनी निवडून आले आहे. मात्र कायद्यानुसार त्यांनी वायनाडमधील आपल्या खासदारकीचा राजीनामा दिला आहे. या जागेवरून आता त्यांची बहीण प्रियांका गांधी निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. काँग्रेसने दिलेला हा प्रस्ताव प्रियांका यांनी अद्याप स्वीकारला नाही. निवडणूक लढवली तर प्रियांका यांची खासदार होण्याची इच्छा पूर्ण होणार असल्याचे बोलले जात आहे.

राहुल गांधी Rahul Gandhi 2019 मध्ये वायनाडमधून खासदार झाले होते. येथून खासदारकीची पाच वर्षे काम केल्यानंतर त्यांचे वायनाडशी भावनीक नाते जुळले होते. यावेळी ते वायनाडमधून तब्बल 3 लाख 64 हजार मतांनी निवडून आले आहे. त्यामुळे हा प्रियांका गांधी यांच्यासाठीही हा मतदारसंघ सेफ मानला जात आहे.

काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी Sonia Gandhi राज्यसभेच्या सदस्य झाल्याने रायबरेली मतदारसंघातून कोण लढणार, असा प्रश्न होता. त्यावेळी प्रियांका गांधींच्या नावाची सर्वत्र चर्चा होती. मात्र वायनाडची निवडणूक झाल्यानंतर या जागेवरून राहुल गांधींनीच निवडणूक लढवली. तर प्रियांका यांनी त्यांना निवडून आणण्यासाठी रणनीती आमलात आणली. त्याचे फळ मिळून येथून राहुल गांधींचा तब्बल 3 लाख 90 हजार मतांनी विजय झाला.

आता दोन्ही जागांवरून निवडून आल्याने नियमांनुसार राहुल गांधींनी रायबरेलीची खासदारकी कायम ठेवत वायनाडमधून राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. आता त्यांच्या रिक्त होणाऱ्या जागी प्रियांका गांधी निवडणूक लढवणार असल्याची घोषणाही करण्यात आली. 'लडकी हूँ, लढ शकती हूँ,' असे उद्गार प्रियांका गांधींनी Priyanka Gandhi लोकसभेत काढले होते. त्यामळेच त्यांना वायनाड येथून रिंगणात उतरवणार असल्याचे काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT