Sharad Pawar News : लोकसभा निवडणुकीतील यशानंतर शरद पवार विधानसभेच्या पेरणीसाठी प्रचंड अॅटीव्ह झालेत. तीन दिवसात 11 शेतकरी मेळावे घेणार असून, पुण्यात विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्या दोन दिवस बैठका घेणार आहेत. शरद पवार यांचा नुकताच दुष्काळी दौरा झाला. या दौऱ्यात त्यांना महायुती भाजप सरकारविरोधात बरचं काही सापडलं आहे. यातूनच त्यांनी विधानसभेची पेरणीला सुरवात केली आहे.
लोकसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला शरद पवार, उद्धव ठाकरे आणि काँग्रेसच्या (Congress) नेतृत्वाखाला यश मिळाले. आता विधानसभेच्या निवडणुकीचा महाविकास आघाडी एकसंघपणे समोरे जाण्याचे संकेत देखील मिळाले आहेत. लोकसभेच्या निकालानतंर आता राज्यात सरकार बदलायचे आहे, असे शरद पवार बोलू लागले आहे. राज्यात सध्या दुष्काळी परिस्थिती आहे. काही ठिकाणी पावसाचा तडाखा बसला असला तरी, सरकारकडून दुष्काळी परिस्थितीवर नियोजन झालेले नाही. त्याचा फायदा शरद पवार घेणार असेच दिसते आहे. यातूनच त्यांनी शेतकरी मेळावांचा धडाखा लावला आहे.
शरद पवार (Sharad Pawar) उद्यापासून तीन दिवस 11 शेतकरी मेळावा घेणार आहे. तसे नियोजन करण्यात आले आहेत. या मेळाव्यात शेतकऱ्यांशी ते संवाद साधतील. बारामती तालुक्यात हे सर्व शेतकरी मेळावे होणार आहेत. या तीन दिवसात शरद पवार शेतकऱ्यांकडून काय घेतात आणि त्यांना काय देतात, याकडे लक्ष लागले आहे. या शेतकरी मेळाव्यानंतर ते लगेचच 21 आणि 22 तारखेला पुण्यात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या बैठका घेतील. सलग दोन दिवस बैठका होणार असल्याने पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना देखील उत्सुकता आहे.
दुष्काळी दौऱ्यावेळी शेतकऱ्यांशी संवाद साधताना, शरद पवार यांना बरचं काही हाती लागले आहे. 'शेतकऱ्यांना दुष्काळातील नुकसानाची माहिती सरकारपर्यंत पोचवा. आम्हाला न्याय द्या', अशी विनंती केली. यावर शरद पवार यांनी 'मी सरकारला सांगणार आहे. पण ते माझे कितपत ऐकतील माहित नाही. सरकारने शेतकऱ्यांचे ऐकण्यासाठी जशी लोकसभेत साथ दिली, तशी विधानसभेला साथ द्या', असे शरद पवार यांनी म्हणत शेतकऱ्यांना सरकार बदलण्याचे आवाहन केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.