Priyanka Gandi at Kamakhya Devi Mandir 
देश

Priyanka Gandhi: प्रियांका गांधी पंतप्रधान होणार! कामाख्या देवीचा आशीर्वाद घेतल्यानंतर साधूनं केली मोठी भविष्यवाणी

Priyanka Gandhi: या भविष्यवाणीमुळं राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली असून प्रियांका गांधी यांच्या राजकीय प्रवासावर आणि भविष्याबाबत सोशल मीडियावर चर्चा सुरु झाल्या आहेत.

Amit Ujagare

Priyanka Gandhi will become a Prime Minister of India : काँग्रेसच्या खासदार, सरचिटणीस आणि आसाम स्क्रिनिंग कमिटीच्या अध्यक्षा प्रियांका गांधी या पंतप्रधान होणार असल्याची भविष्यवाणी कामाख्या मंदिरातील एका साधूनं केली आहे. या भविष्यवाणीमुळं राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली असून प्रियांका गांधी यांच्या राजकीय प्रवासावर आणि भविष्याबाबत सोशल मीडियावर चर्चा सुरु झाल्या आहेत. प्रियांका गांधी यांनी आज आसामची राजधानी गुवाहाटी इथल्या प्रसिद्ध कामाख्या देवीच्या मंदिराला भेट दिली. दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी गुवाहाटीला गेल्यानंतर कामाख्या देवीचं दर्शन घेतलं होतं तेव्हापासून मराठी जनतेमध्ये या देवीची चर्चा होत असते.

प्रियांका गांधीबाबत काय केली भविष्यवाणी

कामाख्या देवीचं दर्शन घेतल्यानंतर प्रियांका गांधी यांच्याभोवती माध्यमांच्या प्रतिनिधींचा गराडा होता. यावेळी त्यांनी आसामच्या निवडणुकीवर आणि राजकीय विषयावर प्रतिक्रिया विचारली. पण प्रियांका गांधींनी सांगितलं की, "हे धार्मिक स्थळ आहे त्यामुळं इथं राजकीय बोलणं योग्य ठरणार नाही. पण उद्या जेव्हा मी तुम्हाला भेटेन त्यावेळी राजकारणावर बोलेन" यानंतर पुढे गेल्यानंतर मंदिरातील एका साधूनं प्रियांका गांधी यांची भेट घेतली आणि त्यांना आशीर्वाद दिला, त्यांच्यासोबत आपल्या मोबाईलमध्ये एक फोटो काढून घेतला. तसंच एक महत्वाची भविष्यवाणी देखील केली. साधूनं म्हटलं की, "देशाचं या वर्षी भलं होणार असून आमची मुलगी प्रधानमंत्री बनेल" असं या साधूनं म्हटलं.

साधूनं प्रियांका गांधी पंतप्रधान होणार असं उच्चारल्याक्षणी प्रियांका गांधी यांनी चेहऱ्यावर हास्य अन् आश्चर्यचकीत करणारी भावमुद्रा दिसली. त्यानंतर त्यांनी तात्काळ तिथून काढता पाय घेतला. पण या साधुच्या भविष्यवाणीची चर्चा मात्र मंदिर परिसरात होताना दिसली. यावेळी त्यांच्यासोबत काँग्रेसचे आसाममधील नेते खासदार गौरव गोगोई आणि इतर नेते मंडळी उपस्थित होती. साधूचा प्रियांका गांधींना आशीर्वाद देतानाचा आणि भविष्यवाणी करतानाचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

एकनाथ शिंदेंनी अनेकदा दिली भेट

शिवसेनेत बंडखोरी केल्यानंतर एकनाथ शिंदे आपल्या सहकारी आमदारांना घेऊन गुवाहाटीला गेले होते या ठिकाणी त्यांनी कामाख्या देवीचं दर्शन घेतलं होतं. त्यानंतर राज्यात नवं सरकार स्थापन झालं होतं. कामाख्या देवीच्या आशीर्वादामुळंच नवं सरकार अस्तित्वात आलं असं त्यावेळी शिदेंनी म्हटलं होतं. त्यानंतर शिंदेंनी पुन्हा एकदा गुवाहाटीला जाऊन कामाख्या देवीचं दर्शन घेतलं होतं. त्यामुळं राजकीय लोकांसाठी कामाख्या देवीचा आशीर्वाद किती महत्वाचा आहे, अशी चर्चा होत असते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT