

Solapur, 19 February : सोलापूर महापालिकेच्या स्वीकृत दहा नगरसेवकपदासाठी तब्बल ६२ जणांनी अर्ज दाखल केले आहेत, त्यात भाजपकडून सर्वाधिक ५९ जणांचा समावेश असून एमआयएमकडून संधी मिळावी यासाठी तिघांचे अर्ज आले आहेत. त्यामुळे स्वीकृत नगरसेवकपदासाठी सोलापुरात प्रचंड चुरस दिसून येत आहे. दरम्यान, भाजपकडून आमदारांनी सूचविलेली काही नावे आघाडीवर असल्याची माहिती आहे, त्यामुळे संधी कोणाला मिळते, याकडे सोलापूरच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
सोलापूर (Solapur) महापालिकेत नगरसेवक पदाच्या १०२ जागा असून त्यानुसार दहा नगरसेवक स्वीकृत म्हणून नेमता येणार आहेत. भारतीय जनता पक्षाने सर्वाधिक ८७ जागा जिंकल्या असून त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका नगरसेवकाने पाठिंबा दिला आहे, त्यामुळे भाजपला स्वीकृतच्या नऊ जागा मिळणार आहेत. एमआयएम पक्षाने आठ जिंकल्या असून त्यांना स्वीकृतची एक जागा मिळू शकते.
देशापासून महापालिकेपर्यंत सत्तेवर असलेल्या भाजपकडे (BJP) सर्वाधिक इच्छूक आहेत. त्यानुसार भारतीय जनता पक्षाकडून तब्बल ५९ जणांनी अर्ज भरले आहेत. आता यातील केवळ ९ नऊ जणांनाच संधी मिळू शकते. ते भाग्यवान पदाधिकारी कोण, अशी चर्चा सोलापूर शहरात रंगली आहे. भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाने मात्र नेहमीप्रमाणे आपल्या पक्षाच्या अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर केलेली नाही, त्यामुळे भाजपश्रेष्ठींचा आशीर्वाद कोणाला मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष आहे.
स्वीकृत नगसेवकपदाची लॉटरी लागावी; म्हणून अनेकांनी आपापल्या गॉडफादरच्या माध्यमातून फिल्डिंग लावली आहे. पण प्रत्यक्षात स्वीकृत नगरसेवकपदी कोणाची वर्णी लागते, हे पाहावे लागणार आहे. आमदार आणि पदाधिकारी कोणासाठी आपली ताकद लावतात, हेही तितकेच महत्वाचे आहे.
यांनी भरले अर्ज
विजयकुमार भिकमचंद कालाणी, राजीव सुभाष आडकी, प्रभाकर लिंगप्पा जामगुंडे, जहागिरदार गाझी ईस्माईल सादिक, यशवंत शिवबसप्पा हिरापूरे, जगदीश रेवणसिध्दप्पा पाटील, रोहिणी रामचंद्र तडवळकर,जयवंत मधुकर थोरात, श्रीनिवास रामकरण दायमा, अक्षयकुमार ज्ञानेश्वर अंजिखाने, मिलींद मधुकर क्षीरसागर, ॲड. राजन दिगंबर दीक्षित, फिरदोस मौलाली पटेल, रुद्रमणी गुरुसिध्दप्पा बोरामणी, चन्नया शरणय्या स्वामी, नय्युम अ अजीज सालार, सतीश बालकिसन झंवर, रवि विठ्ठल नादरगी, सौ. सरोजना श्रीकांत मुलिंटी, अरुण शिवशंकर मेणसे, सुधा अविनाश अळळीमोरे, शकील अलीशेर शेख, महेश भिवा सर्वगोड.
देवेंद्र विठ्ठल मादने, कृष्णकुमार गोविंदलाल झंवर, संदीप भगवान बंडे, अनुपम सिताराम खंडेलवाल, देवेंद्र तिमप्पा भंडारे, मल्लिनाथ हणमंतप्पा राचेटी, हेमंत वामू पिंगळे, सोमनाथ पुंडलिक कंगनाळकर, चंद्रकांत गोविंदलाल तापडिया, साधना प्रकर्ष संगये, सचिन अशोक कुलकर्णी, जय दत्ता साळुंखे, विशाल अशोक बगले, श्रीकांत मुरलीधर घाडगे, दैदिप्य दिलीप वडापूरकर, लक्ष्मीकांत शामसुंदर दरक, जवाहर रतनलाल नाजू, नागेश संदेश भोगडे, केतन मारेंद्रभाई शहा, रमाकांत भगवान साळुंखे, ज्ञानेश्वर कृष्णहरी म्याकल, सचिन शिवप्रसाद लडा, पांडुरंग सिद्रामप्पा दिड्डी, महेश रतनलाल तापडिया.
रविकांत श्रीकांत कोळेकर, प्रतिक उमेश आडम, शकुंतला लक्ष्मीकांत दरक, दिलीप तानाजी पवार, ऋषीकेश विठ्ठल मेट्रे, वृषाली वीरधवल चालुक्य, आनंद गोविंदलाल खंडेलवाल, महेश अंबुसा मेंगजी, संजय बालाजी शिरसट, दत्तात्रय तुकाराम पाटील, राघवेंद्र अंबादास मिठ्ठाकोल, तुळशीदास मुरलीधर भुतडा, सूरजसिंह प्रतापसिंह चव्हाण, किसनराव रघुनाथ घोडके, मनीष शिवाजी केत आदी ६२ जणांनी भाजप आणि एमआयएमकडून स्वीकृत नगरसेवकपदासाठी अर्ज केले आहेत.
भाजपची ही नावे आघाडीवर
दरम्यान, भारतीय जतना पक्षाकडून रोहिणी तडळवकर, रुद्रेश बोरामणी, ॲड. साधना सांगवे, ज्ञानेश्वर म्याकल, वृषाली चालुक्य यांची, तर मंत्री चंद्रकांत पाटील यांचे निकटवर्तीय म्हणून जगदीश पाटील, आमदार विजयकुमार देशमुख यांचे जवळचे सचिन कुलकर्णी, महेश तापाडिया, तुळशीदास भुतडा, आमदार देवेंद्र कोठे गटाचे अक्षय अंजीखाने, तर आमदार सुभाष देशमुख गटाकडून जयवंत थोरात, सोमनाथ केंगनाळकर यांची नावे आघाडीवर आहेत.
एमआयएमकडून नईम सालार
एमआयएमकडून संधी मिळावी म्हणून तिघांनी अर्ज केले आहेत. मात्र, गटनेत्या वहिदाबानो शेख म्हणाल्या की, स्वीकृतपदासाठी नईम सालार यांचे नाव पक्षाकडून आले आहे, त्यानुसार त्यांचा अर्ज आला आहे. इतरांनी कोणी अर्ज भरले आहेत, याबाबत आम्हाला काही माहिती नाही, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.