Chhagan Bhujbal : "भुजबळ विमानात बसले, दोन्ही इंजिन सुरु झाले अन् अचानकच..." स्वतःच सांगितला थरारक प्रसंग

Chhagan Bhujbal Plane Technical Issue : धुळे विमानतळावर मंत्री छगन भुजबळ यांच्या विमानात बिघाड झाला. विमान धुळ्याहून शिर्डीला जाणार होतं. पण भुजबळांनी प्रसंगावधान राखत योग्य निर्णय घेतला.
Chhagan Bhujbal
Chhagan BhujbalSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Politics : महाराष्ट्राचे दिवगंत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती विमानतळावर विमान अपघातात दुर्देवी मृत्यू झाला. बारामती विमानतळावर उतरताना धावपट्टीशेजारी असलेल्या एका शेतात त्यांचे विमान कोसळले. सकाळी 8:44 वाजता हा अपघात झाला. अजित पवार यांच्यासह कॅप्टन सुमित कपूर, कॅप्टन शांभवी पाठक, अजित पवार यांचे सुरक्षारक्षक विदिप जाधव, फ्लाइट अटेंडंट पिंकी माळी यांचाही या अपघातात मृत्यू झाला. अवघा महाराष्ट्र ही बातमी ऐकुन सुन्न झाला.

या विमान अपघातानंतर राज्यातील राजकीय नेत्यांच्या विमान सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. दरम्यान, राष्ट्रवादीचे नेते व राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या विमानातही तांत्रिक बिघाड झाल्याची माहिती समोर आली आहे. स्वतः भुजबळ यांनी हा थरारक प्रसंग सांगितला आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर धुळे जिल्ह्यातील बोरकुंड येथे बुधवार (दि. १८) छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा अनावर सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्यासाठी कालच मंत्री भुजबळ हे विमानाने मुंबईहुन धुळ्याला आले. धुळ्याहुन ते पुढे शिर्डीला जाणार होते. शिर्डीवरुन मग ते येवल्याला रस्ते मार्गाने येणार होते. मात्र धुळे विमानतळावरच विमानात तांत्रिक बिघाड झाल्याने त्यांनी विमानाने शिर्डीला जाणे टाळले. ते शिर्डीला न जाता बायरोड धुळ्याहुन थेट येवल्यात त्यांच्या मतदारसंघात पोहोचले. येवल्यात पोहचल्यानंतर धुळे विमानतळावर नेमकं काय घडलं याची थरारक माहिती आज (दि. १९) फेब्रुवारी रोजी येवल्यात पत्रकारांशी संवाद साधताना भुजबळांनी दिली.

Chhagan Bhujbal
Supriya Sule : रोहितची काळजी वाटते, अजितदादांच्या तपासाबाबत भीती व्यक्त करत सुप्रिया सुळेंची राज्य सरकारकडे मोठी मागणी

भुजबळांनी सांगितलं की, धुळे येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण काल होतं. त्यामुळे मी ठरवलं होतं की, मुंबईहून धुळ्याला विमानाने जायचं आणि विमानानेच धुळ्यावरुन शिर्डीला येऊन गाडीने रस्ते मार्गाने येवल्याला यायचं. त्यानुसार आम्ही विमानात बसलो. विमानाचे दोन्ही इंजिन सुरु झाले. ते धावपट्टीवर जाणार आणि उड्डाण घेणार होते. तितक्यात डॅशबोर्डवरील जे स्क्रीन आहेत ते दोन्हीच्या दोन्ही बंद पडले. त्यामुळे सहाजिकच नेव्हिगेशनपासून सर्वच गोष्टी बंद झाल्या असत्या. त्यामुळे मग सॉफ्ट लँडिंगला वैगरे प्रॉब्लेम झाला असता. ते विमान भरकटलं असतं. मला माहिती नाही काहीही होऊ शकलं असतं. त्यामुळे आम्ही ते उड्डाण रद्द केले, अशी माहिती छगन भुजबळ यांनी दिली.

तोबडतोब मी ते उड्डाण कॅन्सल केलं. त्यानंतर मग आम्ही त्यांना तुमच्या इंजिनिअरला बोलून काय असेल ते करा. तोपर्यंत तुम्ही थांबा. यानंतर मग मी गाडीने रस्त्याने येवल्याला पोहोचलो. इंजिन आहे, मशीन आहे. त्यात काही काही वेळा असे प्रॉब्लेम होतात असं छगन भुजबळ म्हणाले.

Chhagan Bhujbal
Rohit Pawar : अजितदादांच्या अपघातावरुन राजकारणाचा 'र', रोहित पवारांचा विखे पाटलांवर पलटवार

मिळालेल्या माहितीनुसार, बोरकुंड येथे हेलिपॅडची सुविधा करण्यात आली होती. मात्र मंत्री भुजबळ हे हॅलिकॅप्टरने न जाता विमानाने मुंबईहुन धुळ्याला गोंदूर विमातळावर गेले. गोंदूर येथून ते कारने बोरकुंड येथे पोहचले. बोरकुंड येथील कार्यक्रम आटोपून ते पुढे विमानानेच शिर्डीला जाणार होते. शिर्डीवरुन मग ते येवल्याला रस्ते मार्गाने येणार होते. परंतु बोरकुंड येथेच कार्यक्रमाला त्यांना जास्त उशीर झाला होता. त्यात धुळे विमानतळावर त्यांच्या विमानात बिघाड झाल्याने त्यांना रस्ते मार्गाने येवल्याला यावं लागलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com