Priyanka Gandhi Sarkarnama
देश

Priyanka Gandhi On Bangladesh Violence : बांगलादेशात हिंदूंवरील हल्ल्यांवर प्रियांका गांधींची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या...

Mayur Ratnaparkhe

Priyanka Gandhi Reaction on Bangladeshi Hindu बांगलादेशात सध्या हिंदूंसह अन्य अल्पसंख्यांकांवर हल्ले आणि अत्याचार सुरू आहे. ज्यावर केवळ भारतामधूनच नाहीतर जगभरातील अनेक देशांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. दरम्यान, या हल्ल्यांवर आता काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांचीही प्रतिक्रिया समोर आली आहे.

प्रियांका गांधी(Priyanka Gandhi) यांनी सोमवारी त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करत म्हटले की, 'शेजारील देश बांगलादेशात अल्पसंख्यांकांवर सतत होत असलेल्या हल्ल्यांच्या बातम्या विचलित करणाऱ्या आहेत.'

त्यांनी म्हटले की, 'कोणत्याही सभ्य समाजात धर्म, जाती, भाषा किंवा ओळखीच्या आधारावर भेदभाव, हिंसा आणि हल्ले अस्वीकारार्ह आहेत. तसेच प्रियांका गांधींनीही हेही म्हटले की, आम्हाला आशा आहे की बांगलादेशातील परिस्थिती लवकरच सामान्य होईल आणि तेथील नवनिर्वाचित सरकार हिंदू, ख्रिश्चन आणि बौद्ध धर्म मानणाऱ्या नागरिकांची सुरक्षा आणि सन्मान सुनिश्चित करेल.'

बांगलादेशात हिंदू समूदाय, आवामी लीगच्या नेत्या शेख हसीना यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा दिल्यानंतर आणि आरक्षण संबंधी मुद्द्य्यावरून हिंसक आंदोलनानंतर चिंतेत आहे. या पार्श्वभूमीवर रविवारी हिंदू समूदाय चटगांव येथे मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरला आणि आपल्या जीव, संपत्ती व धार्मिक स्थळांच्या सुरक्षेची मागणी केली. याचबरोबर या हिंदू समूदायाकडून हेही सांगितले गेले की, बांगलादेश आमची मातृभूमी आहे आणि आम्ही कुठेही जाणार नाही.

बांगलादेशात हिंदूंविरोधात व्यापक आणि लक्ष्यित हिंसाचाराच्या बातम्या समोर येत असताना, संयुक्त राष्ट्रानेही याकडे लक्ष दिले आहे आणि मोहम्मद यूनुस यांच्या नेतृत्वातील अंतरिम बांगलादेशी सरकारला अल्पसंख्यांकाची सुरक्षा करण्यास सांगितले आहे. तसेच मोहम्मद यूनुस यांनीही बांगलादेशात अल्पसंख्यांकांवर सुरू असलेल्या हल्ल्यांवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT