Narendra Modi Sarkarnama
देश

Narendra Modi : 100 वर्षांच्या समस्या 100 दिवसात सुटणार नाहीत : रोजगार मेळाव्यात मोदींचे वक्तव्य!

Narendra Modi : 10 लाख बेरोजगारांसांठी भरती मोहिमेचा शुभारंभ मोदींच्या हस्ते झाला.

सरकारनामा ब्यूरो

दिल्ली : "100 वर्षांची बेरोजगारीची समस्या 100 दिवसांत सुटू शकत नाही. यामध्ये सरकारचा प्रयत्न म्हणून आज एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरलाआहे. सरकार उत्पादन आणि पर्यटनाच्या विस्तारावर भर देत आहे, कारण या क्षेत्रात मोठ्या प्रमाणवर रोजगार निर्माण होतात, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हंटले आहे. 10 लाख बेरोजगारांसांठी भरती मोहिमेचा शुभारंभ मोदींच्या हस्ते झाला.

मोदी म्हणाले, सरकार उत्पादन आणि पर्यटनाच्या विस्तारावर भर देत आहे, कारण ते मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण करतात. यावेळी मोदींनी कोरोना साथी दरम्यान केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयावरही भाष्य केले. "कोरोना साथीच्या काळात एमएसएमई क्षेत्राला केंद्राच्या 3 लाख कोटी रुपयांच्या मदतीमुळे 1.5 कोटींहून अधिक नोकऱ्यांचे संकट टळले. या कार्यक्रमादरम्यान 75,000 नवनियुक्त नियुक्त्यांना नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात येत आहेत, असेही मोदी म्हणाले.

पंतप्रधान कार्यालयाच्या निवेदनानुसार, युवकांसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हावे आणि नागरिकांचे हित साधण्यासाठी या दिशेने हे एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. पंतप्रधान कार्यालयाने निवेदनात म्हटले आहे की, "सर्व मंत्रालये आणि विभाग मंजूर पदांवरील रिक्त पदे भरण्यासाठी अॅक्शन मोडमध्ये काम करत आहेत."

"गट-अ, गट-ब (राजपत्रित), गट-ब (अराजपत्रित) आणि गट-क अशा विविध स्तरांवर या नियुक्त्यांमध्ये सरकारचा समावेश असेल. ज्या पदांवर नियुक्त्या केल्या जात आहेत त्यात केंद्रीय सशस्त्र दलातील कर्मचारी, उपनिरीक्षक, कॉन्स्टेबल, एलडीसी, स्टेनो, पीए, आयकर निरीक्षक, एमटीएस, इतर विभाग आहेत.” असे निवेदनात म्हँटले आहे.

ही भरती थेट मंत्रालयातून आणि किंवा केंद्रिय लोकसेवा आयोग, आणि रेल्वे भर्ती बोर्डांसारख्या एजन्सींद्वारे भरण्यात येणार आहेत. "जलद भरतीसाठी, निवड प्रक्रिया सोपी आणि तंत्रज्ञान-सक्षम बनवले गेले आहे, असे निवेदनात म्हंटले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT