Gurpreet Singh Gopi killed in Ferozepur Sarkarnama
देश

AAP Leader Murder : भर बाजारात AAP नेत्याची गोळ्या झाडून हत्या; नगरपंचायत निवडणुकीच्या वादातून हल्ला?

AAP leader Gurpreet Singh Gopi murdered : पंजाबच्या फिरोझपूर जिल्ह्यातील ममदोटमध्ये चार हल्लेखोरांचा गोळीबार; गुरप्रीतसिंग यांचा मृत्यू, हरप्रीत गंभीर जखमी; नगरपंचायत अध्यक्षही निशाण्यावर असल्याची माहिती.

Pradeep Pendhare

Punjab Political Murder: पंजाबमधील फिरोझपूर जिल्ह्यात आम आदमी पक्षाचे (आप) नेते गुरप्रीतसिंग ऊर्फ गोपी यांची भर बाजारात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. ममदोटच्या मुख्य बाजारात चार सशस्त्र हल्लेखोरांनी गुरप्रीतसिंग आणि हरप्रीत ऊर्फ हॅप्पी यांच्यावर गोळीबार केला. या घटनेत गुरप्रीतसिंग यांचा मृत्यू झाला असून हरप्रीत गंभीर जखमी झाले आहेत.

पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, अलीकडे झालेल्या नगरपंचायत निवडणुकीतील (Municipal Election) वैयक्तिक वैमनस्यातून हा हल्ला झाल्याचा संशय आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असून आरोपींची ओळख पटल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

शनिवारी सायंकाळी चार हल्लेखोर मोटारीतून ममदोटच्या मुख्य बाजारात आले. त्यांनी वाहनातून उतरून मोटारसायकलवरून जात असलेल्या 45 वर्षीय गुरप्रीतसिंग आणि 22 वर्षीय हरप्रीत ऊर्फ हॅप्पी यांच्यावर गोळीबार केला.

गोळीबारानंतर दोघांना उपचारासाठी नागरी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी गुरप्रीतसिंग यांना मृत घोषित केले. हरप्रीत यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारांसाठी लुधियाना येथील खासगी रुग्णालयात हलवण्यात आले.

नगरपंचायत अध्यक्षही हल्लेखोरांच्या निशाण्यावर?

सूत्रांच्या माहितीनुसार, आम आदमी पक्षाचे (AAP) नवनियुक्त ममदोट नगरपंचायत अध्यक्ष विक्की मैनी हे स्वतंत्र कारमधून गुरप्रीतसिंग यांचा पाठलाग करत होते. हल्लेखोरांनी त्यांच्यावरही गोळीबार केल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, या हल्ल्यात ते बचावले. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांनी घटनास्थळी तपास सुरू केला आहे.

निवडणुकीतील वैमनस्याचा संशय

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या हत्येमागे अलीकडे झालेल्या नगरपंचायत निवडणुकीशी संबंधित वाद असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. वैयक्तिक वैमनस्यातून हा हल्ला झाल्याचेही तपासात समोर आले आहे. मात्र, हत्येचे नेमके कारण आणि हल्ल्यामागील इतर बाबी तपास पूर्ण झाल्यानंतरच स्पष्ट होतील.

आरोपींच्या शोधासाठी पोलिसांची पथके रवाना

पोलिसांनी हल्लेखोरांची ओळख पटल्याचे सांगितले असून त्यांना अटक करण्यासाठी विविध ठिकाणी पोलिसांची पथके रवाना करण्यात आली आहेत. आरोपींचा शोध आणि हल्ल्यामागील नेमका कट याबाबत पोलिसांकडून तपास सुरू आहे. या घटनेनंतर ममदोट परिसरातील राजकीय वातावरणही तापण्याची शक्यता असून, पोलिसांच्या पुढील तपासाकडे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT