Newasa violence : नेवासा हल्ल्यावर सोमय्या आक्रमक; पोलिसांना 24 तासांचा अल्टिमेटम

Kirit Somaiya warns of protest over BJP leader Rishikesh Shete attack in Newasa : भाजप नेते ऋषिकेश शेटे यांच्यावरील हल्ल्याची पाहणी; कारवाई न झाल्यास स्वतः आंदोलन करण्याचा किरीट सोमय्यांचा इशारा
Kirit Somaiya
Kirit SomaiyaSarkarnama
Published on
Updated on

Newasa Rishikesh Shete attack : भाजप जिल्हा उपाध्यक्ष ऋषिकेश शेटे यांच्यावर नेवासा येथे जमावाने केलेल्या जीवघेण्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी भेट दिली.

किरीट सोमय्या यांनी थेट पोलिस प्रशासनावर धारेवर धरले. मुस्लिमांना हात लावला तर दंगे होतील, अशी प्रशासनाची भूमिका असते. आम्ही हे सहन करणार नाही. या प्रकरणात पोलिसांनी ठोस कारवाई केलेली नाही, असा गंभीर आरोप केला.

भाजपचे (BJP) ऋषिकेश शेटे यांनी रस्त्यावरील अतिक्रमणे हटवण्याची तक्रार दिली होती. प्रशासनाने त्यावर कारवाई करत असताना, तेथून जात असलेले ऋषिकेश शेटे यांच्यावर जमावाने हल्ला केला. यात त्यांचे वाहन फोडले गेले. नेवासा पोलिसांनी तब्बल 90 जणांविरोधात गुन्हा नोंदवत, त्यातील 16 जणांना अटक केली आहे. अटकेतील बहुतांशी विशिष्ट समाजाचे असून, ते पोलिस कोठडीत आहेत.

या प्रकारानंतर नेवासात तणाव आहे. ही घटना घडल्यापासून पोलिसांचा बंदोबस्त कायम आहे. किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी आज भेट देत, पोलिस प्रशासनाशी आणि भाजप पदाधिकाऱ्यांशी संवाद साधून वस्तूस्थिती जाणून घेतली. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

Kirit Somaiya
BJP leader attack : PI दराडेंचा दणका; भाजप नेत्यावरील हल्लाप्रकरणात 16 अटकेत, 14 जणांना पोलिस कोठडी

किरीट सोमय्या म्हणाले, "बांगलादेशी माफिया हिंदू मंदिराच्या आसपास कब्जा करत आहेत. नेवासा येथील घटना त्याचाच भाग आहे. भाजप पदाधिकाऱ्यावर हल्ला करणारे सर्व आरोपी मुस्लिम होते. हा योगायोग नाही. मुस्लिम माफियांकडून ठरवून अतिक्रमणाचे प्रकार सुरू आहे. सरकारी कामात अडथळा घातला, तरी पालिकेकडून तक्रार का नाही? असा प्रश्न करत, याप्रकरणी पुढील 24 तासात गुन्हे दाखल झाला पाहिजे. नेवासा येथे एकही बांगलादेशींचे अतिक्रमण दिसता काम नये."

Kirit Somaiya
BJP Rishikesh Shete Attack : नेवाशात भाजप जिल्हा उपाध्यक्षाला घेरलं; वाहनाची तोडफोड, 90 जणांवर गुन्हा

मुस्लिमांना हात लावला, तर दंगे होतील, अशी प्रशासनाची भूमिका असते. आम्ही हे सहन करणार नाही. नेवासा प्रकरणात पोलिसांनी ठोस कारवाई झालेली नाही, असा गंभीर आरोप करत, कारवाई झाली नाही, तर मी स्वतः इथे येऊन आंदोलन करणार असल्याचा इशारा किरीट सोमय्या यांनी दिला. येथे एकही बांगलादेशी मुस्लिम फेरीवाला दिसता कामा नये. या प्रकरणात स्थानिक पोलिसांनी कारवाई केली नाही, तर वरिष्ठांना जाब विचारणार, असेही सोमय्या यांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com