Chandigarh News: भाजप नेत्याची भरदिवसा गोळ्या झाडून निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना ताजी असतानाच आणखी एक खळबळ उडवून देणारी माहिती पंजाब भाजप कार्यालयातून समोर येत आहे. याचदरम्यान,आता पंजाब आणि हरियाणा या दोन राज्यांची संयुक्त राजधानी असलेल्या चंदीगड शहरात भाजपच्या कार्यालयाबाहेर स्फोट झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे.
चंदीगड येथे भाजप कार्यालयाबाहेर झालेल्या स्फोटामुळे एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिस पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. ही स्फोटाची घटना बुधवारी (ता.1एप्रिल) संध्याकाळी सहाच्या सुमारास घडली आहे. भारतीय जनता पक्षाचं चंदीगडमध्ये सेक्टर 37 येथे कार्यालय आहे. या स्फोटामुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.
पंजाब भाजप कार्यालयाबाहेर झालेल्या या स्फोटाची तीव्रता कमी होती. तसेच या स्फोटाच्या घटनेत सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती समोर येत आहे.मात्र,तेथे असलेल्या वाहनांचं नुकसान झाल्यानं समोर येत आहे. कार्यालयाबाहेर उभ्या असलेल्या एका होंडा एक्टिवा दुचाकीमध्ये हा स्फोट झाला. या स्फोटाबाबतचं कारण अद्याप समोर आलेलं नाही.
भाजप कार्यालयाबाहेरच थेट स्फोट झाल्यानं पोलिस प्रशासन हादरलं आहे. या बॉम्ब स्फोटामागे घातपाताची आहे का याबाबत चर्चा सुरू आहे. पोलिसांसह फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी दाखल झाली असून या स्फोटाबाबतच तपास सुरू करण्यात आला आहेत. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांकडून तपासले जात आहेत.
मध्य प्रदेशातील भाजपचे स्थानिक नेते आणि नगरसेवक कल्लू कुशवाह यांची मंगळवारी (ता.31 मार्च) भरदिवसा गोळ्या झाडून निर्घृण हत्या करण्यात आली होती. या घटनेमुळे मध्य प्रदेशातील प्रचंड खळबळ उडाली आहे. या धक्कादायक घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीती आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.अशातच आता पंजाब-हरियाणाची संयुक्त राजधानी असलेल्या चंदीगडमध्ये भाजप कार्यालयाबाहेर झालेल्या स्फोटानं उलटसुलट चर्चा जोरदारपणे सुरू झाली आहे.
कल्लू कुशवाह नेहमीसारखे सकाळी फिरण्यासाठी घराबाहेर पडले होते. त्यावेळीच काही अज्ञात हल्लेखोरांनी त्यांची गोळ्या घालून हत्या केली होती. हल्लेखोरांनी त्यांच्यावर अंदाधुंद गोळीबार केला. गोळ्यांचा वर्षाव इतका तीव्र होता की, कुशवाह यांना स्वतःचा बचाव करण्याचीही संधी मिळाली नाही. काही क्षणात ते रक्ताच्या थारोळ्यात कोसळले आणि जागीच त्यांचा मृत्यू झाला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.