Punjab Cabinet Expansion
Punjab Cabinet Expansion  Sarkarnama
देश

Punjab Cabinet Expansion : मंत्रिमंडळात दोन नव्या चेहऱ्यांना संधी ; प्रकाश सिंह बादल यांचा पराभव करणारे आमदार झाले मंत्री

सरकारनामा ब्यूरो

Gurmeet Singh Khudian Became Minister : पंजाबमधील भगवंत मान सरकारने बुधवारी आपल्या मंत्रिमंडळाचा विस्तार केला. यात दोन नव्या मंत्र्यांना शपथ देण्यात आली. पंजाबचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी राजभवनात त्यांनी गोपनियतेची शपथ दिली.

गुरमीत सिंह खुडिया आणि बलकार सिंह यांनी आज मंत्रीपदाची शपथ घेतली. मान सरकारचा हा तिसरा मंत्रिमंडळ विस्तार आहे. गुरमीत सिंह खुडिया हे मुक्तसर येथील लंबी मतदारसंघातील आमदार आहेत. बलकार सिंह हे जालंधरमधील करतारपूर येथील आमदार आहेत.

२०२२ मध्ये झालेल्या पंजाब विधानसभा निवडणुकीत त्यांनी पाच वेळा मुख्यमंत्री राहिलेले प्रकाश सिंह बादल यांचा त्यांच्या बालेकिल्ल्यात ११ हजार ३९६ मतांनी पराभव केला होता. हा मतदारसंघ बादल यांचा बालेकिल्ला होता. येथून त्यांनी शेवटची निवडणूक लढवली होती.

गुरमीत हे माजी खासदार जगदेव सिंह खुडिया यांचे सुपुत्र आहेत. ते अनेक वर्ष काँग्रेसमध्ये सक्रीय होते.बलकार सिंह हे माजी पोलीस अधिकारी आहेत. पंजाब पोलिसांमधून सेवानियुक्तीनंतर त्यांनी २०२१ मध्ये आम आदमी पक्षात प्रवेश केला होता. पहिल्याच निवडणुकीत ते आमदार झाले.

भगवंत मान सरकार मंत्रिमंडळाचा हा तिसरा विस्तार आहे, भगवंत मान यांनी जुलै २०२२ मध्ये पहिल्यादा मंत्रिमंडळ विस्तार केला होता. त्यात पाच आमदारांनी मंत्रीपदाची शपथ दिली होती. जानेवारीमध्ये 'आप'चे ज्येष्ठ नेते, आमदार डॅा. बलबीर सिंह यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली होती. फौजा सिंह सारारी यांनी राजीनामा दिल्यानंतर सिंह यांना मंत्री बनविण्यात आले.

(Edited By : Mangesh Mahale)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT