Bhagwant Mann Sarkarnama
देश

Punjab News : मुख्यमंत्र्यांची बोट हेलकावे खाऊ लागली अन्‌ अधिकाऱ्यांच्या काळजाचा ठेका चुकला; भगवंत मान थोडक्यात बचावले...

सरकारनामा ब्यूरो

Punjab Flood : गेल्या काही दिवसांपासून उत्तर भारतात पावसाने हाहाकार उडला आहे. पंजाब आणि दिल्लीत सर्वत्र पूरस्थिती आहे. युमना नदीला दिल्लीत महापूर आलेला आहे. पंजाबमधील जालंधर भागातही पूरस्थिती हाताबाहेर गेली आहे. जालंधर भागात आलेल्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी गेलेले मुख्यमंत्री भगवंत मान यांची नाव पुरात हेलकावे खाऊ लागली. मात्र, सोबत असलेले खासदार संत बलवीर सिंग यांनी बोटीवर ताबा मिळविला, त्यामुळे मुख्यमंत्र्यासह आपचे अनेक नेते थोडक्यात बचावले. (Punjab Chief Minister Bhagwant Mann, who went to inspect flood situation, narrowly escaped)

पंजाबचे (Punjab) मुख्यमंत्री भगवंत मान (Bhagwant Mann) हे जालंधरमधील पूरग्रस्त भागाला भेट द्यायला गेले होते. त्यावेळी त्यांनी बोटीतून जाऊन पूरपरिस्थितीची (Flood) पाहणी केली. पाहणी करायला जाताना बोटीत प्रमाणापेक्षा जास्त लोक बसले. त्याकडे कुणाचेही लक्ष गेले नाही. बोट सुरू होऊन थोड्या अंतरावर गेल्यावर बोट डगमगू लागली. बोटीत प्रमाणापेक्षा अधिक लोक बसले होते, पाण्यात बोट डोलू लागल्याने बाहेर एकच गोंधळ उडाला.

मुख्यमंत्री मान यांच्यासोबत बोटीमध्ये प्रमाणापेक्षा जास्त लोक बसले होते. बोट पाण्यात गेल्यानंतर काळा धूर निघू लागला. तेव्हाच बोट पाण्यात हेलकावे खाऊ लागली. हा प्रकार पाहून प्रशासकीय अधिकाऱ्यांचे हातपाय लटपटू लागले. मुख्यमंत्री मान यांच्यासोबत राज्यसभा सदस्य संत बलवीर सिंग सिचेवालही होते.

बोट पाण्याच्या प्रवाहाच्या मधोमध आल्यावर अचानक अनियंत्रित झाली. बोट पाण्यात इकडे तिकडे डोलू लागली. मात्र, संत सीचेवाल यांनी तातडीने बोटीवर ताबा मिळवला आणि दुर्घना टळली. चालकानेही प्रयत्नांची पराकष्ठा करत बोट दुसऱ्या बाजूला नेण्यात यश मिळविले. त्यानंतर उपस्थित नेते आणि अधिकाऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.

दरम्यान, मुख्यमंत्री किंवा वरिष्ठ नेत्यांचा पूरग्रस्त भागात दौरा असतो, त्यावेळी बोट सुस्थितीत आहे की नाही, याची तपासणी केली जाते. तसेच, बोटीत किती लोक बसणार आहेत, हे अधिकारी अगोदरच ठरवतात. पण, मुख्यमंत्री मान यांच्या पाहणी दौऱ्यावेळी बोटीत बसण्यापासून का थांबविण्यात आले नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT