Congress  Sarkarnama
देश

Punjab Congress : काँग्रेसमध्ये घमासान, प्रदेशाध्यक्षांच्या नियुक्तीवरून उभी फूट; थेट हायकमांडच्या निर्णयाला आव्हान

Charanjit Singh Channi, Punjab Congress president : राज्यात २०२२ मध्ये झालेल्या निवडणुकीत आम आदमी पक्षासमोर काँग्रेसची वाताहत झाली होती. आता २०२७ च्या निवडणुकीत आपसमोर आव्हान उभे करण्याची तयारी पक्षाने केली आहे.

Rajanand More

Punjab politics : पंजाबमधील विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने जोरदार तयारी सुरू केली आहे. त्यासाठी पक्षाने मागील आठवड्यातच पक्षसंघटनेत विविध नियुक्त्या करत निवडणुकीचे रणशिंग फुंकले. मात्र, त्यानंतर काही तासांत पक्षात घमासान सुरू झाले आहे. प्रदेशाध्यक्षांच्या नियुक्तीवर नेत्यांमध्ये उभी फूट पडली असून नेत्यांनी थेट हायकमांडच्या निर्णयाला आव्हान दिल्याचे चित्र आहे.

काँग्रेसने अमरिंदर सिंह राजा वडिंग यांच्यावर पुन्हा विश्वास दाखवत त्यांना प्रदेशाध्यक्षपदी कायम ठेवले आहे. त्यावरून माजी मुख्यमंत्री चरणजित सिंग चन्नी यांच्या गोटात खळबळ उडाली आहे. चन्नी यांच्या समर्थकांनी वडिंग यांना हटविण्याची जोरदार मागणी केली आहे. वडिंग यांच्याजागी चन्नी यांची नियुक्ती न केल्यास राज्यात पक्षाची सत्ता येणार नाही, असा सूचक इशारा त्यांनी दिला आहे.

चन्नी यांच्या निवासस्थानी नियुक्तीच त्यांच्या समर्थक नेत्यांची बैठक झाली. या बैठकीत चन्नी यांनाच प्रदेशाध्यक्षपद करण्याची आग्रही मागणी करण्यात आली. हायकमांडपर्यंत ही मागणी पोहोचविण्याची जबाबदारीही चन्नी यांच्यावरच टाकण्यात आली. दुसरीकडे वडिंग यांच्या समर्थकांकडूनही एकजूट केली आहे. चन्नी यांचे मन वळविण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून केला जाणार आहे.

पक्षाचे ज्येष्ठ नेते नजर सिंह मनशाहिया म्हणाले, 'लोक चन्नी यांच्या बाजूने आहेत. वडिंग हेच प्रदेशाध्यक्ष राहिले तर राज्यात काँग्रेसची सत्ता येणार नाही. त्यामुळे चन्नी यांना प्रदेशाध्यक्ष बनवायला हवे. ते राज्यात निवडणूक जिंकण्याचा प्लॅन करू शकतात.' दरम्यान, प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती न झाल्याने चन्नीही नाराज असल्याचे सांगितले जात आहे. मागील अनेक महिन्यांपासून हे पद मिळण्यासाठी त्यांच्याकडून तयारी सुरू होती, अशी चर्चा आहे.

राज्यात २०२२ मध्ये झालेल्या निवडणुकीत आम आदमी पक्षासमोर काँग्रेसची वाताहत झाली होती. आता २०२७ च्या निवडणुकीत आपसमोर आव्हान उभे करण्याची तयारी पक्षाने केली आहे. अशावेळी पक्षात प्रदेशाध्यक्षपदावरून घमासान सुरू असल्याने नेतृत्वाची चिंता वाढली आहे. पक्षातील वाद उघडपणे चव्हाट्यावर आली आहे. निवडणुकीआधी गटातटाचे वाद मिटवून एकत्रितपणे निवडणुकीला सामोरे जाण्याचे आव्हान पक्षासमोर असणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT