Sukhbir Singh Badal Sarkarnama
देश

Sukhbir Singh Badal Firing: गोळीबारानंतर सुखबीर सिंह बादल यांची भावुक पोस्ट; 'त्या' दोन पोलीस अधिकाऱ्यांची घेतली गळाभेट

Sukhbir Singh Badal shooting incident at Golden Temple: सुवर्ण मंदिरात धार्मिक शिक्षा भोगत असलेल्या सुखबीर सिंह बादल यांच्यावर गोळीबार करण्यात आला होता. यातून ते थोडक्यात बचावले गेले आहेत.

Mangesh Mahale

Punjab News: पंजाबचे माजी मुख्यमंत्री आणि शिरोमणि अकाली दलाचे नेता सुखबीर सिंह बादल यांच्यावर दोन दिवसापूर्वी सुवर्णमंदिर परिसरात गोळीबार झाला. यात ते बचावले. स्वतःचा जीव धोक्यात टाकून दोन पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांना वाचवले. त्यानंतर बादल यांनी त्या पोलीस अधिकाऱ्यांची गळाभेटा घेऊन आभार मानले.

सुखबीर सिंह बादल यांनी याबाबत आपल्या सोशल मीडिया एक्सवरुन भावुक पोस्ट शेअर केली आहे. यात त्यांनी पोलीस अधिकारी जसवीर सिंह आणि हिरा सिंग यांचे आभार मानले आहे. "स्वतःचा जीव धोक्यात घालून दुसऱ्याचे प्राण वाचवणे ही कठीण बाब आहे. आमचा परिवार या दोन्ही अधिकाऱ्यांचा ऋणी आहे," असे सुखबीर सिंह बादल यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

बुधवारी सुखबीर सिंह बादल यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला होता. सुवर्ण मंदिरात धार्मिक शिक्षा भोगत असलेल्या सुखबीर सिंह बादल यांच्यावर गोळीबार करण्यात आला होता. यातून ते थोडक्यात बचावले गेले आहेत.

दरबार साहिबसमोर हल्लेखोराने केलेल्या गोळीबारामुळे सुवर्ण मंदिर परिसरात खळबळ उडाली होती. मात्र, तेथे उपस्थित लोकांनी आणि दोन पोलीस अधिकाऱ्यांनी हल्लेखोराला तत्काळ पकडलं.

सुखबीर सिंग बादल यांच्यावर हा जीवघेणा हल्ला झाला तेव्हा ते सुवर्ण मंदिराच्या बाहेर एक धार्मिक शिक्षेसाठी द्वारपाल म्हणून सेवा देत होते.नारायण सिंह चौडा असे आरोपीचे नाव आहे. हल्लेखोर नारायण सिंह चौडा खलिस्तानी कारवायांमध्ये सामील असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यांच्यावर यापूर्वीही अनेक हिंसक कारवायांमध्ये सहभाग असल्याचा आरोप आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT