Devendra Fadnavis : 'एकतर तू तरी राहशील, नाहीतर मी...'; ठाकरेंच्या 'त्या' टीकेवर शपथविधीनंतर CM फडणवीसांची प्रतिक्रिया, म्हणाले, "मी त्याचवेळी..."

CM Devendra Fadnavis On Uddhav Thackeray : विधानसभा निवडणुकीपूर्वी शिवसेना पदाधिकाऱ्यांसोबत संवाद साधताना शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांशी संवाद साधताना तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना 'एकतर तू तरी राहशील, नाहीतर मी तरी राहीन,' असा इशारा दिला होता.
Devendra Fadnavis, Uddhav Thackeray
Devendra Fadnavis, Uddhav Thackeray Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News, 06 Dec : विधानसभा निवडणुकीपूर्वी शिवसेना पदाधिकाऱ्यांसोबत संवाद साधताना शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पदाधिकाऱ्यांशी संवाद साधताना तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना 'एकतर तू तरी राहशील, नाहीतर मी तरी राहीन.' असा इशारा दिला होता.

ठाकरेंच्या या निवडणुकीपूर्वीच्या वक्तव्यावर देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी मुख्यमंत्रि‍पदाची शपथ घेतल्यानंतर प्रतिक्रिया दिली आहे. शपथविधीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी राज्यातील राजकीय संस्कृतीवर पुनर्विचार करण्याची गरज असल्याचं वक्तव्य केलं.

2024 नंतरच्या महाराष्ट्राकडे तुम्ही कसं पाहता? असा प्रश्न विचारला असता फडणवीस म्हणाले, "मला असं वाटतं की, महाराष्ट्र वेगाने प्रगती करत आहे. मात्र राज्यातील राजकीय संस्कृतीवर पुनर्विचार करण्याची गरज सर्व पक्षांना आहे. राजकीय वातावरण योग्य कसं करता येईल याचा प्रयत्न आपण केला पाहिजे", असं ते यावेळी म्हणाले.

यावेळी त्यांनी शपथविधीसाठी राज्यातील सर्व नेत्यांना फोन केल्याचंही सांगितलं. ते म्हणाले, "मी शपथविधीच्या निमित्ताने माननीय शरद पवारसाहेब, उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण आणि राज ठाकरे अशा सर्व प्रमुख नेत्यांना स्वतः फोन करून निमंत्रण दिलं. या सर्व नेत्यांनी माझं अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या."

Devendra Fadnavis, Uddhav Thackeray
Devendra Fadnavis Oath Ceremony : निमंत्रण देऊनही फडणवीसांच्या शपथविधीला शरद पवार अनुपस्थित का? मोठं कारण आलं समोर

तसंच महाराष्ट्रातील राजकीय संवाद कधीच संपला नाही. इतर राज्यांमध्ये दोन पक्षांमध्ये किंवा नेत्यांमध्ये मोठ्या प्रमाणात विसंवाद असतो. मात्र तशी परिस्थिती महाराष्ट्रात कधीही नव्हती आणि ती पुढे राहू नये हा माझा प्रयत्न असेल, असं ते म्हणाले.

Devendra Fadnavis, Uddhav Thackeray
Maharashtra Politics : 'या' नेत्यांनी महाराष्ट्राची राजकीय संस्कृती जपली; मतभेद विसरुन सरकारचं अभिनंदन तर केलंच शिवाय...

आम्ही सगळेच राहणार

दरम्यान, यावेळी पत्रकारांनी 'एक तर तुम्ही राहाल नाही तर मी', असं म्हणणाऱ्यांना काय उत्तर द्याल? असं विचारलं असता फडणवीस म्हणाले, "मी त्याचवेळी सांगितलं होतं की, राजकारणात सगळेच राहतात, तेही (उद्धव ठाकरे) राहतील आणि मीही राहील. आम्ही सगळेच राहणार आहोत."

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com