Pakistan Border Sarkarnama
देश

Pakistan Border : पाकिस्तानच्या सीमेवर तब्बल 5 हजार होमगार्ड्स करणार तैनात; देशात पहिल्यांदाच राज्य सरकारचा मोठा निर्णय

Punjab Strengthens Security with BSF Punjab Government : पंजाब सरकारचा अर्थसंकल्प नुकताच सादर करण्यात आला. या अर्थसंकल्पात नागरिकांसाठी अनेक मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत.

Rajanand More

Punjab Budget 2025 : देशाच्या सीमाभागात प्रामुख्याने केंद्रीय यंत्रणांचे सुरक्षा कवच असते. पण आता पंजाब सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. सरकारकडून पाकिस्तानच्या सीमेवर सुरक्षा वाढवली जाणार आहे. तब्बल पाच हजार होमगार्डस नियुक्त केले जाणार आहे. तसेच ड्रोनविरोधी यंत्रणाही उभारली जाणार आहे. त्यासाठी सरकारने अर्थसंकल्पात भरीव आर्थिक तरतूदही केली आहे.

पंजाब सरकारचा अर्थसंकल्प नुकताच सादर करण्यात आला. या अर्थसंकल्पात नागरिकांसाठी अनेक मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे अमली पदार्थांची तस्करी रोखण्यासाठी उपाययोजना केल्या जाणार आहेत. त्यासाठी मोठा निधी खर्च केला जाणार आहे. पण यंदाच्या अर्थसंकल्पात पाकिस्तान सीमेवरील सुरक्षेसाठी करण्यात आलेल्या तरतुदीने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे.

पहिल्यांदाच एखादे राज्य सरकार देशाच्या सीमेची सुरक्षा करणार आहे. पाकिस्तान सीमेची सुरक्षा अधिक मजबूत करण्यासाठी राज्य सरकारने पाच हजार गार्डस तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी बुधवारी सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात 110 कोटी रुपयांची आर्थिक तरतुद करण्यात आली आहे.

अर्थमंत्री हरपाल सिंह चीमा यांनी सांगितले की, सीमेवरून सर्वाधिक अमली पदार्थ आणि हत्यारांची तस्करी होते. ते रोखण्यासाठी मुख्य जबाबदारी केंद्र सरकार आणि बीएसएफची आहे. सीमेलगतचा 50 किमीपर्यंतचा परिसर बीएसएफच्या अंतर्गत येतो. आता पंजाब सरकारही बीएसएफच्या मदतीसाठी पुढे येणार आहे, असे चीमा यांनी स्पष्ट केले.

पंजाबच्या इतिहासात पहिल्यांदाच राज्य सरकार सीमेवर बीएसएफसोबत पाच हजार होमगार्डस तैनात करणार असून दुसरी सुरक्षा सीमा करणार आहे. या होमगार्ड्सची निवड राज्यांतील युवकांमधून केली जाईल, हे युवक राज्याच्या भविष्याची सुरक्षा करतील, असेही चीमा यांनी सांगितले. दरम्यान, राज्य सरकारच्या या निर्णयावर केंद्रीय गृह मंत्रालय म्हणजे गृहमंत्री अमित शाह काय बोलणार, याबाबत उत्सुकता वाढली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT