RSS : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची 'शंभरी' दणक्यात साजरी होणार... 3 महिन्यांचा मेगा प्लॅन जाहीर

RSS News : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला यावर्षीच्या विजयादशमीला 100 वर्षे पूर्ण होत आहेत. ही शंभरी दणक्यात साजरी करण्यात येणार आहे.
RSS Route March
RSS Route MarchSarkarnama
Published on
Updated on

RSS News : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला यावर्षीच्या विजयादशमीला 100 वर्षे पूर्ण होत आहेत. ही शंभरी दणक्यात साजरी करण्यात येणार आहे. त्यासाठी या शताब्दी वर्षात संघकार्याचा विस्तार करण्याचा संकल्प संघाने केला आहे.

याचाच भाग म्हणून नोव्हेंबर 2025 ते जानेवारी 2026 हे 3 महिने घरोघरी संपर्क मोहीम राबविण्यात येणार आहे. सर्व मंडळे, वस्त्यांमध्ये 'हिंदू संमेलने' घेतली जाणार आहेत, अशी माहिती कोकण प्रांत कार्यवाह विठ्ठलराव कांबळे यांनी बुधवारी येथे पत्रकार परिषदेत दिली.

RSS Route March
Ashok Chavan-Raosaheb Danve In Assembly : अशोक चव्हाण-रावसाहेब दानवे यांना विधिमंडळाची भुरळ! अधिवेशन काळात दिली भेट..

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेची सांगता रविवारी (23 मार्च) बंगळूर येथे झाली. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत आणि सरकार्यवाह दत्तात्रेय होसबाळे यांच्या उपस्थितीत ही प्रतिनिधी सभा झाली. देशभरातून एक हजार ४४३ प्रतिनिधी या सभेत सहभागी झाले होते. या सभेत बांगलादेशातील हिंदू समुदायावर झालेल्या हल्ल्यांबाबत चिंता व्यक्त करणारा आणि एकजुटीचे आवाहन करणारा ठराव मंजूर करण्यात आला.

कांबळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, याच प्रतिनिधी सभेत शताब्दी वर्षात संघकार्याचा विस्तार करण्याचा संकल्प संघाने केला आहे. या हिंदू संमेलनांच्या माध्यमातून जात, धर्म आणि आर्थिक विषमतेच्या भिंती तोडून सर्वांना समान संधी आणि सन्मान मिळावा यासाठी प्रयत्न केले जातील.

RSS Route March
Narendra Modi Nagpur visit : "...अन्यथा काळे झेंडे दाखवू"; PM मोदींच्या नागपूर दौऱ्याआधीच विदर्भवाद्यांचा इशारा

कुटुंबव्यवस्थेला बळकटीकरण, कायदा पालन, मतदान, सामाजिक कार्यात सहभाग आणि राष्ट्रहितासाठी योगदान यांचा पंचसूत्रीत समावेश असेल. हर गाव, हर बस्ती, घर घर या संकल्पनेनुसार या मोहिमेत देशभरात एक कोटी कार्यकर्ते सहभागी होतील, अशी माहितीही त्यांनी दिली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com