Alcohol availability at petrol pumps India news Sarkarnama
देश

Liquor sale at petrol pumps : 'उडता पंजाब'ला राज्य सरकारचेच पाठबळ : तळीरामांना आता पेट्रोल पंपावरही मिळणार दारू

Alcohol availability at petrol pumps India news : पेट्रोल पंपावर मद्य मिळणार या चर्चेचं खरं काय? सरकारचा निर्णय आणि व्हायरल बातमीमागचं सत्य जाणून घ्या.

Rashmi Mane

मद्यपींसाठी खूशखबर आता पेट्रोल पंपावरही मिळणार अशी चर्चा सध्या जोरात सुरू आहे. आता पेट्रोल पंपावरही मद्य मिळणार का? हा खरोखर सरकारचा निर्णय आहे की फक्त अफवा, याबाबत अनेकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

मात्र, पंजाब सरकारने 2026-27 या आर्थिक वर्षासाठी नवीन उत्पादन शुल्क धोरणाला सरकारने मंजुरी दिली आहे. या धोरणामुळे मद्यविक्रीसंदर्भात काही महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे यापुढे दारू फक्त पारंपरिक दारू दुकानांवर मिळणार नाही तर पेट्रोल पंप, शॉपिंग मॉल्स, स्थानिक बाजारपेठा आणि संघटित डिपार्टमेंटल स्टोअर्समध्येही उपलब्ध होणार आहे.

सरकारने एल-10B परवाना पुन्हा सुरू केला आहे. यामुळे मोठ्या स्टोअर्सना विदेशी मद्य, वाईन आणि बिअर विकण्याची परवानगी मिळणार आहे. या बदलामुळे ग्राहकांना अधिक सोयीस्कर आणि सुरक्षित वातावरणात खरेदी करता येईल, असा प्रशासनाचा दावा आहे. विशेषतः महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी ही व्यवस्था अधिक सुलभ ठरेल, असे सांगितले जात आहे.

याशिवाय, राज्यात 97 नवीन मद्यदुकानांच्या लिलावाला मंजुरी देण्यात आली असून त्यांची एकूण राखीव किंमत 454.35 कोटी ठेवण्यात आली आहे. यामुळे सरकारच्या महसुलातही वाढ होण्याची शक्यता आहे. नवीन धोरणात पारदर्शकतेवर विशेष भर देण्यात आला आहे. प्रत्येक मद्यविक्री केंद्रावर डिजिटल पेमेंट अनिवार्य करण्यात आले आहे. कार्ड किंवा पीओएस मशीनद्वारेच व्यवहार करणे बंधनकारक असेल. छापील बिल न देता विक्री केल्यास 5000 दंड आकारला जाईल.

तसेच मद्य वाहतूक करणाऱ्या वाहनांसाठी जीपीएस ट्रॅकिंग सिस्टीम बंधनकारक करण्यात आली आहे. बॉटलिंग प्लांट्सना आठवड्यातून 6 दिवस काम करण्याची परवानगी असेल. सीसीटीव्ही आणि थेट देखरेखीद्वारे संपूर्ण यंत्रणेवर नियंत्रण ठेवले जाणार आहे. महागाई आणि कच्च्या मालाच्या वाढत्या किमती लक्षात घेता, मद्याच्या दरात जास्तीत जास्त 2 टक्क्यांपर्यंत वाढ होऊ शकते.

एकूणच, पेट्रोल पंपावर मद्य विक्रीचा मुद्दा पूर्णपणे अफवा नसून, तो नवीन धोरणाचा एक भाग आहे. मात्र हा निर्णय फक्त पंजाब राज्यापुरताच मर्यादित आहे. त्यामुळे इतर राज्यांमध्ये अशीच अंमलबजावणी होईल का, हे पुढील काळात स्पष्ट होईल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT