स्वयंघोषित कॅप्टन अशोक खरात प्रकरणात आता सरकारने कडक पावले उचलण्यास सुरुवात केली असून विशेष तपास पथकाने तपासाचा वेग वाढवला आहे. महिला अत्याचाराच्या गंभीर आरोपांनंतर या प्रकरणाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. तपास यंत्रणांनी तांत्रिक पुरावे गोळा करत खरातच्या संपूर्ण जाळ्याचा पर्दाफाश करण्यासाठी मोहीम हाती घेतली आहे.
सध्या तपास पथकाकडून खरातचे मोबाईल कॉल रेकॉर्ड, चॅट्स आणि सोशल मीडिया अकाउंट्सची सखोल तपासणी केली जात आहे. काही धक्कादायक व्हिडिओ पोलिसांच्या हाती लागले असून त्यामधील पीडित महिलांची ओळख पटवून त्यांचे जबाब नोंदवले जात आहेत. या महिलांना न्याय मिळवून देणे हेच तपासाचे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, तपासात एक महत्त्वाची बाब समोर आली आहे. खरातच्या तथाकथित दरबारात अनेक उच्च पदावरील प्रशासकीय अधिकाऱ्यांचा वावर असल्याची माहिती मिळत आहे. एवढेच नाही, तर या अधिकाऱ्यांच्या नातेवाईकांच्या नावावर विविध ठिकाणी जमिनींचे व्यवहार केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी-गवळाणे, सिन्नर तसेच शिर्डी-ओझर परिसरात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक झाल्याची चर्चा सुरू आहे.
अशोक खरात हा पूर्वी मर्चंट नेव्हीमध्ये कार्यरत होता आणि सुमारे 22 वर्षे सेवा केल्यानंतर निवृत्त झाला. त्यानंतर त्याने ज्योतिष आणि अंकशास्त्राचा व्यवसाय सुरू केला. राज्यातील अनेक प्रभावशाली लोक त्याच्याकडे येत असल्याने तो चर्चेत आला. आता मात्र या सर्व प्रकरणामुळे त्याच्याभोवतीचा गूढ उलगडण्याच्या दिशेने तपास वेगाने पुढे जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.