लेकीचा बर्थ डे अन् नववर्षांच्या स्वागत सुरु असताना कुटुंबियांवर शोककळा पसरली. वाढदिवशीच लेकीचा मृत्यू झाल्याने दु:खाचा डोंगर शिवसेना नेत्यावर कोसळला आहे.
मुनमून चितवन (वय 22) असे मृत्यू झालेल्या मुलीचे नाव आहे. पंजाबमधील शिवसेना (उत्तर भारत) प्रमुख दीपक कंबोज यांची मूनमून ही लेक होती.
१ जानेवारी हा मुनमून चितवनचा वाढदिवस असतो. दरवर्षीप्रमाणे 1 जानेवारीला नववर्षांचं स्वागत आणि आपल्या लाडक्या लेकीचा वाढदिवस साजरा करण्याची दीपक कंबोज यांचे कुटुंबिय तयारीत मग्न होते. वाढदिवस, नववर्षांनिमित्त घरात आनंदाचे वातावरण होते. मात्र या वाढदिवशीच तिच्या घरातून तिची अंत्ययात्रा निघाली.
काल (गुरुवारी) वाढदिवसाच्या सेलिब्रेशनपूर्वी आंघोळीसाठी बाथरूममध्ये गेली होती, काही कालावधीनंतर ती बाहेर आलीच नाही. तिच्या कुटुंबियांनी बाथरुमचा दरवाजा तोडला असता मुनमून खाली पडलेली दिसली. ती मृतावस्थेत आढळली. तिचा गॅस गिझरमुळे मृत्यू झाल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. जालंधरमध्ये ही घटना घडली.
बाथरूममधील गॅस गिझरच्या पाईपमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे कार्बन मोनोऑक्साइड वायूची गळती सुरू होती. बाथरूमधून हवा बाहेर जाण्यासाठी पुरेशी जागा नव्हती. त्यामुळे काही वेळातच मुनमुनला श्वास घेण्यास त्रास झाला असावा, ती बाथरुममध्येच पडली. रुग्णालयाचत दाखल करण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला, असे मुनमूनचे वडील दिपक कंभोज यांनी सांगितले.
या घटनेने संपूर्ण जालंधर गावावर शोककळा पसरली. मृत मुनमून खूप हुशार आणि मनमिळावू मुलगी होती. तिच्या वाढदिवसाची घरात पार्टीची तयारी सुरु असतानाच नियतीने घात केल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.