CM Bhagwant Mann, Raghav Chadha President Droupadi Murmu meeting at Rashptrapati Bhavan.  Sarkarnama
देश

Raghav Chadha President meeting : भाजपचे 21 राज्यांत सरकार, 21 राज्यांत पोलीस..! राघव चड्ढा यांनी राष्ट्रपतींना भेटून येताच दिली धमकी, काही मिनिटांत CM मानही राष्ट्रपती भवनात...

Droupadi Murmu meeting AAP, Bhagwant Mann Rashtrapati Bhavan : आपमधून भाजपमध्ये प्रवेश केलेले खासदार संदीप पाठक यांच्यावर पंजाबमध्ये दोन गुन्हे दाखल झाले आहेत. यापार्श्वभूमीवर चड्ढा यांनी दिलेला हा इशारा महत्वाचा मानला जात आहे.

Rajanand More

BJP AAP conflict : आम आदमी पक्षाच्या पंजाबमधील सहा आणि दिल्लीतील एका राज्यसभा खासदाराने भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. आज दिल्लीत मोठ्या घडामोडी घडल्या. भाजपमध्ये प्रवेश केलेले खासदार राघव चड्ढा यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली. त्यानंतर काही मिनिटांतच मुख्यमंत्री भगवंत मानही राष्ट्रपतींना भेटले.

राघव चड्ढा यांच्यासोबत अन्य तीन खासदारही होते. राष्ट्रपतींच्या या भेटीगाठींमुळे चर्चांना उधाण आले आहे. भेटीनंतर मीडियाशी बोलताना चड्ढा यांनी पंजाबमधील आप सरकारसह अधिकाऱ्यांना गर्भित इशारा दिला आहे. ते म्हणाले, आम्ही आपसोबत होतो तेव्हा खूप आज्ञाधारक आणि संस्कारी होतो. आम्ही तात्विक कारणांसाठी पक्षाला सोडले की आम्ही भ्रष्टाचारी बनलो. पंजाबमध्ये पोलीस आणि प्रशासनाचा दुरुपयोग केला जात आहे.

राष्ट्रपतींना पंजाबमधील या स्थितीची माहिती दिली. त्यांनी आमच्या आणि संविधानाच्या संरक्षणाचे आश्वासन दिले आहे. मी पंजाब सरकारमधील अधिकाऱ्यांना सांगू इच्छितो की, सरकारमधील नेत्यांच्या सांगण्यावरून तुम्ही तुमचे करिअर आणि नोकरी पणाला लावू नका. आम आदमी पक्षाचे एका राज्यात सरकार आहे आणि एकाच राज्यात सरकार, भाजपचे २१ राज्यात सरकार आहे आणि २१ राज्यात पोलीस आहे, असे म्हणत चड्ढा यांनी आपच्या नेत्यांना अप्रत्यक्षपणे धमकी दिली आहे.

आपमधून भाजपमध्ये प्रवेश केलेले खासदार संदीप पाठक यांच्यावर पंजाबमध्ये दोन गुन्हे दाखल झाले आहेत. यापार्श्वभूमीवर चड्ढा यांनी दिलेला हा इशारा महत्वाचा मानला जात आहे. दरम्यान, चड्ढा हे राष्ट्रपती भवनातून बाहेर आल्यानंतर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान राष्ट्रपतींच्या भेटीसाठी दाखल झाले.

मुख्यमंत्री मान यांनी भेटीबाबत सांगताना मीडियाला माहिती दिली. ते म्हणाले, सात खासदारांनी भाजपमध्ये केलेला प्रवेश असंविधानक आहे. त्यामुळे त्यांचे सदस्यत्व रद्द झाले पाहिजे. देशात भाजपचे सरकार असून यंत्रणांचा वापर करून धमकावले जात आहे. पण पंजाबमध्ये आम्ही हे चालू देणार नाही. जे चुकीचे काम करतील, त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असे आपण राष्ट्रपतींना सांगितल्याची माहिती मान यांनी दिली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT