Mamata Banerjee audio clip controversy : मारपीट, धमकी अन् अधिकाऱ्यांचे संगनमत..! ममता बॅनर्जी यांचा ऑडिओ बॉम्ब

Bhawanipur counting irregularities : भवानीपूरमध्ये ममता बॅनर्जी यांचा १५ हजारांहून अधिक मतांनी पराभव झाला आहे. सलग दुसऱ्या निवडणुकीत त्या पराभूत झाल्या आहेत. २०२१ मध्ये नंदीग्रामध्येही अधिकारी यांनी त्यांना पराभूत केले होते.
Mamata Banerjee
Mamata BanerjeeSarkarnama
Published on
Updated on

West Bengal election news : पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेसचा दारुण पराभव झाला आहे. एवढेच नाही तर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी याही पराभूत झाल्या आहेत. त्यामुळे ही निवडणूक त्यांना सर्वात मोठा धक्का देणारी ठरली आहे. त्यानंतर आता ममतादीदींची एक ऑडिओ क्लिप समोर आली आहे. यामध्ये त्या गुंडांनी आपल्याला मारल्याचा, एजंटला बाहेर काढल्याचा, निवडणूक प्रक्रियेत तडजोड झाल्याचा आरोप करताना दिसत आहे.

ममता बॅनर्जींच्या पक्षाचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी ही क्लिप सोशल मीडियात पोस्ट केली आहे. ममतांच्या भवानीपूर विधानसभा मतदारसंघातील मतमोजणीदरम्यानची ही क्लिप आहे. दोन नेत्यांमध्ये या ऑडिओ क्लिपमध्ये ममता बॅनर्जी गंभीर आरोप करताना दिसत आहेत. त्या वादा करत आहेत की, आपण १६ फेरीपर्यंत भाजपचे उमेदवार शुभेंदू अधिकारी यांच्यापुढे होतो. त्यानंतर मोजकेच राऊंड होते.

निवडणूक प्रक्रियेत तडजोड झाली आहे. कारण मतमोजणी केंद्रात गुंड घुसले आहेत. अधिकारी आणि एजंटला धमकावले. आपल्यासोबतही मारपीट झाल्याचा दावा ममता बॅनर्जी करत असल्याचे क्लिपमध्ये ऐकू येते. सीआरपीएफ आणि स्थानिक निवडणूक अधिकाऱ्यांवर आरोप करताना त्यांनी दिल्लीच्या सुचनेनुसार भाजपला फायदा पोहोचविण्यासाठी ते काम करत असल्याचे म्हटले आहे.

Mamata Banerjee
Thalapathy Vijay performance : तमिळनाडूत धक्कादायक ट्विस्ट; सत्ता काबीज केलेल्या विजय यांच्या वडिलांनीच आघाडीबाबत वाढविली धाकधूक...

दरम्यान, भवानीपूरमध्ये ममता बॅनर्जी यांचा १५ हजारांहून अधिक मतांनी पराभव झाला आहे. सलग दुसऱ्या निवडणुकीत त्या पराभूत झाल्या आहेत. २०२१ मध्ये नंदीग्रामध्येही अधिकारी यांनी त्यांना पराभूत केले होते. भवानीपूर हा तृणमूलचा बालेकिल्ला मानला जात होता. त्यामुळे ममतांसाठी हा मतदारसंघ सुरक्षित होता. पण त्यानंतरही भाजपच्या लाटेत ममतांना आपला गड वाचविता आला नाही.

Mamata Banerjee
Congress South India win : ‘मोदी ब्रँड’ फेल ठरला, दक्षिण भारतात पुन्हा काँग्रेसचा दबदबा; नवी समीकरणे जुळणार?

आता तृणमूलकडून भवानीपूरमधील निकालाला कोर्टात आव्हान देण्याची तयारी सुरू करण्यात आल्याचे समजते. अखेरच्या काही फेऱ्यांमध्ये गडबड झाल्याचा आरोप केला जात आहे. अखेरच्या फेऱ्यांमध्ये टीएमसीची ताकद असलेल्या भागातील मतांची मोजणी झाली. तिथे अधिकारी यांनी सर्वाधिक मते मिळाल्याने तृणमूलकडून षडयंत्राचा आरोप केला जात आहे. टीएमसीच्या नेत्यांकडून पुरावे गोळा केले जात असून पुढील एक-दोन दिवसांत याचिका दाखल केली जाऊ शकते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com