Raghuram Rajan Narendra Modi sarkarnama
देश

Raghuram Rajan News :'मोदी पराभूत झाले तर आर्थिक धोरणावर काय परिणाम?', RBI चे माजी गव्हर्नर रघुराम राजन म्हणाले...

Roshan More

Narendra Modi News : लोकसभेच्या सातव्या टप्प्यातील निवडणूक एक जूनला होणार आहे. त्यानंतर चार जूनला लोकसभेचा निकाल जाहीर होईल. मात्र, पंतप्रधान मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान बनणार का? इंडिया आघाडीला किती जागा मिळणार? याची चर्चा सुरू आहे. नरेंद्र मोदी पुन्हा प्रधानमंत्री झाले नाही तर देशाच्या आर्थिक धोरणांवर काय परिणाम होईल, यावर माजी आरबीआय गव्हर्नर रघुराम राजन यांनी भाष्य केलं आहे.

अमेरिकेतील युनिव्हर्सिटी ऑफ शिकागो बूथ स्कूल ऑफ बिझनेसमध्ये रघुराम राजन Raghuram Rajan हे अर्थशास्त्राचे प्राध्यापक आहेत. त्यांनी एका टीव्हीला मुलाखत दिली. निवडणुकीच्या निकालाचा देशाच्या आर्थिक धोरणांवर काहीच परिणाम होणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी Narendra Modi तिसऱ्यांदा पंतप्रधान बनो अथवा न बनो, भारत आपल्या आर्थिक धोरणांनुसार पुढे चालत राहील, असे देखील रघुराम राजन यांनी सांगितले.

नवीन येणाऱ्या सरकारने तिजोरीतून अधिक अधिक पैसा बाहेर काढून तो खर्च करायला हवा. मोदी सरकारने ते केले नाही. नव्या सरकारला या गोष्टींवर लक्ष द्यावे लागेल. पायाभूत सुविधांच्या दर्जाकडे ही लक्ष द्यावे लागेल. मोठ्या कंपन्यांनानाच नाही तर छोट्या कंपन्या आणि छोट्या व्यापाऱ्यांना याचा फायदा व्हायला हवा, असे रघुराम राजन म्हणाले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

रघुराम राजन हे आरबीआयचे गर्व्हनर असताना देशातील आर्थिक धोरणावरून त्यांचे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचे Narendra Modi मतमेद झाले होते. राजने म्हणाले, मी राजकारणात येऊ नये असे माझ्या कुटुंबीयांना वाटते. मला राजकारणात येण्यापेक्षा शक्य तेवढे मार्गदर्शन करायला आवडते, असे राजन म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT