Lok Sabha Election News : लोकसभा निवडणुकीच्या प्रचार दोन दिवसांत संपणार आहे. पण त्याआधीच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे माजी गव्हर्नर रघुराम राजन (Raghuram Rajan News) काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेतील सहभाग असो की मोदी सरकारच्या आर्थिक धोरणांवर टीका...ते सातत्याने काँग्रेसला (Congress) पुरक भूमिका घेत असल्याची चर्चा असते. या चर्चांना त्यांनी मंगळवारी पूर्णविराम दिला.
काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याच्या चर्चेवर बोलताना रघुराम राजन म्हणाले, मी राजकारणात प्रवेश करावा, असे माझ्या कुटुंबाला वाटत नाही. मी सातत्याने हे सांगत आहे, पण लोक माझ्यावर विश्वास ठेवत नाहीत. माझे कुटुंब आणि माझी पत्नीला मी राजकारणात (Politics) चांगल्या कारणासाठी जावे, असे वाटत नाही. त्यामुळे राजकारणात प्रवेश करण्याऐवजी मी शक्य तिथे मार्गदर्शन करत राहीन. (Latest Political news)
मी सरकारमध्ये असलो किंवा नसलो तरी सरकारच्या आर्थिक धोरणांवर मी बोलत राहणार. हाच माझा प्रयत्न राहील, असे सांगत त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेशाच्या चर्चांना पूर्णविराम दिला. त्याचवेळी त्यांनी राहुल गांधी (Rahul Gandhi) यांचे कौतुकही केले. राहुल गांधी सर्वच विषयांवर बोलू शकतील, असे नाही. पण ते समजूतदार असल्याचे रुघराम राजन म्हणाले. (Raghuram Rajan Latest News)
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
राहुल गांधी यांच्याविषयी चुकीचे चित्र निर्माण केले जाते. ते स्मार्ट, बुध्दिमान आणि बहादुर आहेत. त्यांनी आजी आणि वडिलांची हत्या होताना पाहिली आहे. या गोष्टींकडे लोक दुर्लक्ष करतात. असे व्हायला नको, असेही राजन म्हणाले. राहुल गांधींकडे दृढ विश्वास असून ते मांडत असलेल्या मुद्यांशी तुम्ही असहमत असाल तर त्यांच्याशी चर्चा करावी. त्यासाठी ते तयार आहेत, असेही रघुराम राजन यांनी नमूद केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.