Rahul Gandhi | Amit shah Sarkarnama
देश

Rahul Gandhi News : राहुल गांधींना मोठा दिलासा, अमित शाहांचा मानहानीचा खटला कोर्टाकडून रद्द

Rahul Gandhi Amit Shah defamation case latest news : राहुल गांधी यांच्या विरोधात सुलतानपूर येथील MP-Mla कोर्टात अमित शाहांची मानहानी केल्याचा खटला सुरु होता. त्या खटल्याचा निकाल आज लागला.

Roshan More

Rahul Gandhi News : विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्यांच्यावर 2018 मध्ये निवडणूक प्रचारावेळी अमित शहा यांच्याबद्दल कथित आक्षेपार्ह विधाने केल्याचा आरोप होता. दरम्यान, या प्रकरणाची अंतिम सुनावणी आज सुलतानपूर येथील MP-Mla कोर्टात झाली. या सुनावणीत कोर्टाने राहुल गांधींची निर्दोष मुक्तता केली आहे.

2018 मध्ये कर्नाटकमध्ये प्रचारादरम्यान राहुल गांधी यांनी तत्कालीन भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा दावा करत विजय मिश्रा यांनी अमित शाह यांची मानहानी झाल्याचे सांगत केस दाखल केली होती.

दरम्यान, वकील संतोष कुमार यांनी सांगितले की कोर्टाने राहुल गांधींची या प्रकरणातून निर्दोष मुक्तता केली आहे. कोर्ट ने उन्हें IPCच्या कलम 500 अंतर्गत सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली.

आपल्या निर्णयात कोर्टाने म्हटले की, राहुल गांधी यांनी केलेले वक्तव्य हे मानहानी मानले जाऊ शकत नाही. तसेच याचिका दाखल करणारे विजय मिश्रा यांना पीडित मानले जाऊ शकत नाही.

या निकालाबाबत प्रतिक्रिया देताना भाजप नेते जगदंबिका पाल यांनी म्हटले की, कोर्टाने जरी राहुल गांधींना दोषमु्क्त केले असले तरी जनता त्यांनी दोषमुक्त करणार नाही. आज ब्रिक्स पार्लमेंटच्या अंतर्गत संमेलन आहे. त्यामध्ये विरोधी पक्षनेते राहुल गांधी आले नाही. ते पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आई-वडिलांना शिव्या देतात. काँग्रेस अध्यक्षांनी देखील मोदींच्या वडिलांना शिव्या दिल्या. जनता त्यांना माफ करणार नाही.

लोकशाही संविधनाचा विजय

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी या निकालानंतर ट्विट करत म्हटले की, विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना निर्दोष मुक्तता हा देशातील लोकशाहीचा विजय आहे. सुलतानपूर कोर्टाच्या निकालाचा अर्थ स्पष्ट आहे. देशात संविधान चालेल, भाजपची कुत्सित मानसिकता चालनार नाही. सत्यमेव जयते!

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT