

Rahul Gandhi News : विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या ताफ्याचा पूर्वांचल एक्सप्रेस वेवर भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. ताफ्यातील पाच गाड्या आणि एक रुग्णवाहिका एकमेकांना धडकल्याने हा अपघात झाल्याची माहिती आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राहुल गांधी यांच्या विरोधात सुलतानपुरल येथे केस सुरू आहे. त्यासाठी ते आपल्या ताफ्यासह जात होते. मात्र, पूर्वांचल हायवेवर त्यांच्या ताफ्यातील गाड्या एकमेकांवर आदळल्या. या अपघात किती जखमी आहे याची माहिती अद्याप समोर आली नाही. मात्र, प्राथमिक माहितीनुसार राहुल गांधी हे सुरक्षित आहेत.
विरोधात सुलतानपूर कोर्टात अमित शाह यांची मानहानी केल्याबाबत केस सुरू आहे. 2018 मध्ये प्रचारादरम्यान त्यांनी तत्कालीन भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा दावा सुलतानपूरमधील कोर्टात करण्यात आला होता. या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे. त्यासाठी राहुल गांधी आज सुलतापूरला आपल्या ताफ्यासह जात होते.
२०१८ च्या कर्नाटक निवडणुकीच्या काळात बेंगळुरूमध्ये झालेल्या निवडणूक प्रचारादरम्यान, राहुल गांधी यांनी अमित शहा यांच्याबद्दल कथित आक्षेपार्ह विधाने केल्याचा आरोप होता. दरम्यान आज झालेल्या सुनावणीमध्ये कोर्टाने राहुल गांधींची निर्दोष मुक्तता केली आहे.
दरम्यान, एसआयआर आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात काँग्रेस आक्रमक झाली आहे. काँग्रेसकडून रामलिला मैदानावर आंदोलनाची हाक दिली आहे. दिल्लीमध्ये एक नोव्हेंबरला रामलीला मैदानावर काँग्रेस आंदोलन करणार आहे. देशभरातून या आंदोलनासाठी काँग्रेस कार्यकर्ते येणार असल्याची माहिती आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.