

INDIA alliance rally update : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा आणि मतचोरीविरोधात इंडिया आघाडी आक्रमक आहे. त्यासाठी दिल्लीच्या रामलीला मैदानावर ता. १ नोव्हेंबरला सभेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यावरून लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी भाजपला डिवचले आहे.
इंडिया आघाडीच्या रॅलीवर भाजप आणि एनडीएतील पक्षांकडून टीका केली जात आहे. त्यावर राहुल गांधी यांनी सोशल मिडियात एक पोस्ट करत भाजप आणि सहकाऱ्यांचे आभार मानले आहेत. ते या रॅलीचा प्रचारच करत असून पुढील सात दिवस त्याच उत्साहाने आणि निष्ठेने रॅलीचा प्रचार सुरू ठेवण्याचे उपरोधिक आवाहनही राहुल गांधी यांनी केले आहे.
राहुल गांधी यांनी पोस्टमध्ये लोकांना मत चोरीविरोधात रॅलीमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले. तर भाजपने १ नोव्हेंबर रोजी ही रॅली घेऊ नये, असे म्हटले आहे. १९८४ च्या शीखविरोधी दंगलीच्या वर्षपूर्तीचा हा दिवस असल्याने तारीख बदलावी, असे भाजपने म्हटले आहे. मात्र, काँग्रेस यादिवशीच रॅली घेण्यावर ठाण आहे. त्यावरून भाजपने काँग्रेस शीखविरोधी असल्याची टीका केली आहे.
काय म्हटले आहे राहुल गांधींनी?
राहुल गांधी यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे की, आमची मते चोरली जात आहेत, आता देशाला उत्तर द्यावे लागेल. प्रश्न विचारणाऱ्यांवर लाठीचार्ज करण्यात आला, देश आता गप्प बसणार नाही. विद्यार्थी, शेतकरी, मजूर, महिला, तरुण आणि व्यावसायिक यांच्यासह लोकशाहीची काळजी असलेल्या सर्वांनी रॅलीत सहभागी व्हावे. मतदान हा लोकांचा हक्क आहे आणि त्याचे रक्षण करण्यासाठी त्यांनी लढलेच पाहिजे, असेही राहुल गांधी म्हणाले आहेत.
दरम्यान, रॅलीमध्ये एक लाखांहून अधिक लोक सहभागी होतील, असा मोठा दावा काँग्रेसने केला आहे. इंडिया आघाडीतील पक्षांकडून तशी तयारी केली जात आहे. देशभरातून पक्षाचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते, विविध संघटनांचे कार्यकर्ते, नागरिक या रॅलीत सहभागी होणार असून त्यानुसार नियोजन केले जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.