Congress candidate list : देशातील काही प्रमुख राज्यात पुढील काही दिवसांत विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होऊ शकतात. त्यासाठी सर्वच पक्षांनी कंबर असून जागावाटपासह उमेदवार निश्चित करण्यासाठी लगबग सुरू आहे. यामध्ये काँग्रेसने मोठी आघाडी घेतली आहे. पक्षाने मंगळवारी 42 उमेदवारांची पहिली उमेदवारी यादी जाहीर करत भाजपला पिछाडीवर टाकले आहे.
देशातील पुढील काही दिवसात पश्चिम बंगाल, तमिळनाडू, केऱळ, आसाम या राज्यांमध्ये विधानसभेची निवडणूक होणार आहे. त्यापैकी तमिळनाडू वगळता एकाही राज्यात काँग्रेस सत्तेत नाही. मात्र, आगामी निवडणुकीनंतर आसाममध्ये पुन्हा सत्ता मिळण्याची अपेक्षा पक्षाला आहे. त्यासाठीच पक्षाने या राज्यात जोर लावला आहे. सर्वांचे लक्ष पक्षाचे प्रदेशाध्यक्ष व लोकसभेतील उपनेते गौरव गोगोई यांच्याकडे लागले आहे.
पक्षाने आसाममधील पहिली उमेदवारी जाहीर करत त्यामध्ये गोगोई यांना जोरहाट मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. ते जोरहाट लोकसभा मतदारसंघातूनच संसदेत गेले आहे. लोकसभेत विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यानंतर गोगोई हे पक्षाचे दुसऱ्या क्रमांकाचे नेते आहे. त्यामुळे त्यांच्या उमेदवारीला महत्व प्राप्त झाले आहे. राहुल गांधींचे अत्यंत विश्वासू सहकारी म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते.
गोगोई यांनी राज्यात पुन्हा पक्षाला सत्ता मिळवून दिल्यास तेच मुख्यमंत्री बनतील, हे स्पष्ट आहे. त्यांचे वडील तरूण गोगोई हेही अनेक वर्षे राज्याचे मुख्यमंत्री होते. मात्र, मागील दोन निवडणुकांमध्ये काँग्रेसला पराभव पत्करावा लागला होता. यावेळी पक्षाला मतदार हात देतील, अशी नेत्यांना अपेक्षा आहे. मात्र, भाजपने गोगोई यांच्याविरोधात भारतविरोधी असल्याचा गंभीर आरोप करत त्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे.
गोगोई यांच्यावर आरोप होऊनही काँग्रेसने त्यांच्यावर विश्वास दाखविला आहे. त्यांच्यामागे राहुल गांधींसह सर्व नेते ठामपणे उभे राहिले आहेत. गोगोई यांनीही मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्यावर जमीन घोटाळ्याचा आरोप करत राज्यभर रान उठविले आहे. त्यामुळे राज्यात सरमा विरूध्द गोगोई असा सामना पाहायला मिळणार आहे. त्यामध्ये कोण वरचढ ठरणार, याबाबत उत्सुकता वाढली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.