Ramdas Athawale : अखेर रामदास आठवलेंना राज्यसभेची उमेदवारी जाहीर, चर्चांना पूर्णविराम

Rajya Sabha ticket Maharashtra : आता राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन आहे. आठवले यांनी त्यांची नुकतीच भेट घेतली होती. या भेटीमध्ये राज्यसभेबाबत चर्चा झाल्याचे मानले जात होते.
Devendra Fadnavis, Ramdas Athawale
Devendra Fadnavis, Ramdas AthawaleSarkarnama
Published on
Updated on

ाजपज Maharashtra political news : राज्यसभा निवडणुकीची घोषणा झाल्यापासून केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांची उमेदवारी फिक्स मानली जात होती. मात्र, मागील काही तासांत घडलेल्या घडामोडींमुळे भाजप आठवलेंना धक्का देणार का, अशी चर्चा सुरू झाली होती. मात्र, भाजपने या चर्चांना पूर्णविराम देत आठवलेंना उमेदवारी जाहीर केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात आठवले यांचे स्थान आतापर्यंत कायम राहिले आहे. आतापर्यंत भाजपच्या कोट्यातून ते दोनदा राज्यसभेवर निवडून गेले आहेत. आता तिसऱ्यांदाही त्यांना संधी मिळू शकते, अशी चर्चा होती. आठवले यांनी संसदेच्या एका अधिवेशनात राज्यसभेत केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा यांच्यासमोर याबाबत विधान केले होते. त्यावेळी नड्डा हे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष होते.

राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन आहे. आठवले यांनी त्यांची नुकतीच भेट घेतली होती. या भेटीमध्ये राज्यसभेबाबत चर्चा झाल्याचे मानले जाते. काही दिवसांपूर्वीच आठवले यांनी आपण राज्यसभेवर सहज निवडून येऊ शकतो, पण आपल्याला लोकसभा निवडणूक लढवायची असल्याचे विधान केले होते. या विधानानंतर राजकीय चर्चांना उधाण आले होते.

Devendra Fadnavis, Ramdas Athawale
NCP leadership : राष्ट्रवादीत मोठ्या उलथापालथीचे संकेत; जय पवारांसह पाच नावांभोवतीच फिरणार राजकारण

अखेर भाजपने आज आठवले यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे आठवले सलग तिसऱ्यांदा भाजपच्या कोट्यातून राज्यसभेवर जाणार असल्याचे निश्चित झाले आहे. त्यामुळे त्यांच्याकडे केंद्रीय राज्यमंत्रिपदही कायम राहणार आहे.

दरम्यान, आठवले यांनी मंगळवारी फडणवीसांची भेट घेतली होती. या भेटीबाबत खुद्द आठवलेंनीच माहिती दिली. सोशल मीडियात केलेल्या पोस्टमध्ये त्यांनी म्हटले आहे की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी भेट घेऊन येऊ घातलेल्या राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सविस्तर चर्चा झाली. सध्याच्या राजकीय परिस्थितीचा आढावा घेत पुढील रणनीती, समन्वय आणि व्यापक राजकीय घडामोडींवर विचारविनिमय करण्यात आला.

Devendra Fadnavis, Ramdas Athawale
Maharashtra IAS : फडणवीसांच्या टीममधील महिला अधिकाऱ्यासह 3 वरिष्ठ IAS थेट केंद्रात जाणार; 41 जणांच्या यादीत समावेश...

दरम्यान, राज्यात सात जागेंसाठी राज्यसभेची निवडणूक होणार आहे. त्यापैकी चार जागा भाजपला, प्रत्येक एक जागा शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व महाविकास आघाडीला मिळू शकते. अद्याप महाविकास आघाडी आणि शिवसेनेचे उमेदवार निश्चित झालेले नाहीत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com