Rahul Gandhi Sarkarnama
देश

Rahul Gandhi News : '..तर मला नाही वाटत, भाजप 246च्या जवळपासही पोहचली असती'

Mayur Ratnaparkhe

Rahul Gandhi on BJP : लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी तीन दिवसीय अमेरिका दौऱ्यावर आहेत. या दरम्यान मंगळवारी ते वॉशिंग्टन डीसीमधील जॉर्जटाउन यूनिवर्सिटीत पोहचले. येथे त्यांनी विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला. यावेळी त्यांनी भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर निशाणा साधला.

राहुल गांधींनी म्हटले की, निवडणुकीच्या आधी आम्ही या विचारावर जोर देत राहिलो की संस्थांवर कब्जा केला गेला आहे. आरएसएसने शिक्षा प्रणालीवर कब्जा केला आहे. मीडिया आणि तपास यंत्रणांवर कब्जा आहे. आम्ही हे सांगत राहिलो, परंतु लोकांच्या लक्षात येत नव्हतं. मग संविधानाचा मुद्दा पुढे ठेवणं सुरू केलं आणि मग जे काही म्हटलं होतं, ते अचानक फुटलं.

राहुल गांधींनी(Rahul Gandhi) म्हटले की, गरीब भारत, शोषित भारताला समजले की संविधान रद्द केले तर सगळा खेळ संपला. गरिबांनी हे चांगलंच गांभीर्याने समजून घेतलं की, ही संविधानाची रक्षा करणारे आणि याला नष्ट करणाऱ्यांमधील लढाई आहे. जातीय जनगणनेचा मुद्दाही मोठा झाला आहे. या गोष्टी अचानक एकत्र समोर येवू लागल्या. मला नाही वाटत की निष्पक्ष निवडणुकीत भाजप 246च्या जवळपास असेल असे मला वाटत नाही. त्यांच्याकडो खूप मोठा आर्थिक लाभ होता. त्यांनी आमची बँक खाती बंद केली होती.

राहुल गांधी म्हणाले, 'गरीब भारत, शोषित भारताला समजले की संविधान रद्द केले तर सगळा खेळ संपेल. ज्यांनी संविधानाचे रक्षण केले आणि ते नष्ट केले त्यांच्यातील हा लढा आहे हे गरिबांना खोलवर समजले. जात जनगणनेचा मुद्दाही मोठा झाला. या गोष्टी अचानक एकत्र येऊ लागल्या. निष्पक्ष निवडणुकीत भाजप(BJP) 246 च्या जवळपास असेल असे मला वाटत नाही. त्याचा मोठा आर्थिक फायदा झाला. त्यांनी आमची बँक खाती बंद केली होती.

निवडणूक आयोगावर निशाणा साधत राहुल गांधींनी म्हटले की, निवडणूक आयोग तेच करत होते, जे भाजपला हवं होतं. संपूर्ण मोहिमेची रचना अशाप्रकेर केली गेली की, नरेंद्र मोदी देशभरात आफलं करतील. ज्या राज्यांमध्ये ते(भाजप) कमकुवत होते, त्यांनी त्या राज्यांची रचना इतर राज्य जिथं ते मजबूत होते त्यापेक्षा वेगळी केली. मी याकडे नियंत्रित निवडणूक म्हणून पाहतो.

ओबीसी-दलितांना धोका दिला जात आहे -

राहुल गांधींनी म्हटले की, प्रचार मोहिमेच्या अर्ध्यात मोदींना(Modi) नाही वाटलं की ते ३००-४०० जागांच्या जवळ आहेत. जेव्हा ते म्हणाले की, मी थेट देवाशी बोलतो तेव्हा आम्हाला समजलं होतं की आम्ही त्यांना पूर्णपणे उध्वस्त केलं आहे. आम्ही याकडे मानसिक खच्चीकरण म्हणून बघितले. नरेंद्र मोदींना सत्तेत आणणारी आघाडी तुटली आहे. सरकार आणि दोन-तीन उद्योगपतींमध्ये मोठे संगनमत आहे. ओबीसी आणि दलितांना धोका दिला जात आहे.

(Edited by -Mayur Ratnaparkhe )

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT