Rahul Gandhi Death Threat Sarkarnama
देश

Rahul Gandhi Death Threat : "तर, राहुल गांधींना घरात घुसून गोळ्या घालू" : खळबळजन व्हिडीओ व्हायरल, 'त्या' 25 खासदारांनाही शिवीगाळ

Rahul Gandhi Death Threat Karni Sena Controversy: RSSआणि भाजप एक गोडसे फॅक्टरी आहे. करणी सेनेकडून राहुल गांधी आणि २५ खासदारांना दिलेली धमकी वेगळी घटना नाही. हा नियोजित आणि द्वेषपूर्ण कटाचा भाग असून सर्वात आधी किरेन रिजिजू यांनी खोटं बोलून देशाची दिशाभूल केली आहे.

Jagdish Patil

Rahul Gandhi Death Threat Video: लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना घरात घुसून गोळ्या घालण्याची धमकी दिल्याचा व्हिडिओ समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे. धमकी देणाऱ्या व्यक्तीने तो करणी सेनेचा कार्यकर्ता आहे. तर हा धमकीचा व्हिडीओ काँग्रेस नेते पवन खेरा यांनी आपल्या एक्स अकाऊंटवरून शेअर केला आहे.

ज्यामध्ये करणी सेनेचा कार्यकर्ता म्हणतो की, "ज्या प्रकारे काँग्रेसच्या २५ खासदारांनी भारताच्या संसदेत लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना जी शिवीगाळ केली आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्ष आणि करणी सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये संतापले आहेत. राहुल गांधींच्या सांगण्यावरून खासदारांनी हे केलं आहे. त्यामुळे राहुल गांधींनी नीट ऐकावं, पुन्हा असं घडलं तर घरात घुसून गोळ्या घालू आणि याला प्रशासन जबाबदार असेल," असं हा व्यक्ती व्हिडिओमध्ये म्हणत आहे.

शिवाय संबंधित २५ खासदारांवर कारवाई झाली पाहिजे. मंत्री किरेन रिजिजू याचं वक्तव्य ऐकल्यापासून आम्ही खूप रागात असून २४ तासांमध्ये त्या २५ खासदारांना अटक झाली नाही, तर प्रत्येकाला आम्ही गोळ्या घालू, असंही करणी सेनेच्या कार्यकर्त्याने म्हटलं आहे. दरम्यान, काँग्रेस नेते पवन खेरा यांनी या धमकीनंतर बोलताना भाजपवर जोरदार हल्लोबोल केला आहे.

ते म्हणाले, संपूर्ण आरएसएस आणि भाजप एक गोडसे फॅक्टरी आहे. करणी सेनेकडून राहुल गांधी आणि २५ खासदारांना दिलेली धमकी वेगळी घटना नाही. हा नियोजित आणि द्वेषपूर्ण कटाचा भाग असल्याचं ते म्हणाले. तर सर्वात आधी किरेन रिजिजू यांनी खोटं बोलून देशाची दिशाभूल केली की, काँग्रेसच्या खासदारांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांचा अपमान केला.

मात्र, जे व्हिडिओ समोर आले आहेत त्यानुसार त्यांचा दावा पूर्णपणे खोटा असल्याचं स्पष्ट होत आहे. या व्हिडिओत कुठेही अपमान केल्याचे दिसत नाही. उलट यामध्ये लोकसभा अध्यक्ष हसत असल्याचे दिसत आहेत. मात्र, या प्रकरणावरून भाजप खासदारांकडून वेगवेगळ्या व्यासपीठांवर समान वक्तव्य केली जात आहे की, राहुल गांधी हे भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेसाठी सर्वात मोठा धोका आहेत.

हे विरोधकांना बदनाम करण्याचं आणि राहुल गांधींविरोधातील हिंसेला वैध ठरवण्याची सुनियोजित मोहीम असल्याचा दावा देखील खेरा यांनी केला आहे. तसंच कट्टरपंथीय अशाच पद्धतीने काम करतात. ते एकच खोटं ते वारंवार बोलत राहतात आणि त्यांचे समर्थक द्वेष आणि हिंसक होत नाही. तोपर्यंत ते खोटं पसरवतात. तेव्हाही अशाच पद्धतीने गोडसे बनवला आणि आज पुन्हा आणखी एक गोडसे तयार केला जात आहे, अशी टीकाही खेरा यांनी केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT