Galgotias University : चीनचा रोबोडॉग आम्हीच बनवला सांगणाऱ्या गलगोटिया युनिव्हर्सिटीचा आणखी एक खोटारडेपणा उघड, 'तो' ड्रोनही दक्षिण कोरियाचा...

Galgotias Controversy soccer drone controversy : नोएडाच्या गलगोटिया विद्यापीठाने चीनी बनावटीचा 'रोबोटिक डॉग' स्वतः विकसित केल्याचा खोटा दावा केला होता. विद्यापीठाने दावा केलेला रोबोट प्रत्यक्षात चीनच्या यूनिट्री कंपनीचा Go2 मॉडेल असून तो बाजारात 2 ते 3 लाख रुपयांना सहज उपलब्ध असल्याचं समोर आलं.
Robotic dog displayed at the AI Impact Summit Delhi, later identified as the Unitree Go2 model amid the Galgotias University controversy.
Robotic dog displayed at the AI Impact Summit Delhi, later identified as the Unitree Go2 model amid the Galgotias University controversy.Sarkarnama
Published on
Updated on

Galgotias University Controversy : दिल्ली येथे आयोजित केलेला 'एआय इम्पॅक्ट समिट'ची सध्या देशभरात नव्हे जगात चर्चा सुरू आहे. पण दुर्दैवाने ही चर्चा कौतुकाची नव्हे तर ट्रोलिंगची आहे. कारण या एआय समिटमध्ये भारतातील गालगोटिया विद्यापीठाने केलेला कारनामा उघडकीस आल्यामुळे या कार्यक्रमावर देशभरातून संताप व्यक्त केला जात आहे.

नोएडाच्या गलगोटिया विद्यापीठाने चीनी बनावटीचा 'रोबोटिक डॉग' स्वतः विकसित केल्याचा खोटा दावा केला होता. विद्यापीठाने दावा केलेला रोबोट प्रत्यक्षात चीनच्या यूनिट्री कंपनीचा Go2 मॉडेल असून तो बाजारात 2 ते 3 लाख रुपयांना सहज उपलब्ध असल्याचं समोर आलं.

त्यामुळे गलगोटिया विद्यापीठाचा खोटेपणा उघड होताच त्यांचा स्टॉल एआय समिटमधून हटवण्यात देखील आला आहे. मात्र, तोपर्यंत हे प्रकरण देशभरात व्हायरल झालं. धक्कादायक बाब म्हणजे गलगोटिया युनिव्हर्सिटीच्या प्रोफेसर नेहा सिंह सरळ सरळ हा रोबोट आपल्या विद्यापीठाने बनवल्याचा दावा करत असल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

Robotic dog displayed at the AI Impact Summit Delhi, later identified as the Unitree Go2 model amid the Galgotias University controversy.
NCERT Map Controversy : राजपूतांच्या दबावामुळे मराठ्यांच्या इतिहासाशी छेडछाड; आठवीच्या पुस्तकातून मराठा साम्राज्याचा विस्तार दाखवणारा 'तो' नकाशा हटवला

शिवाय त्यांची चोरी पकडल्यानंतरही त्या उडवाउडवीची उत्तर देत असल्यामुळे गलगोटिया युनिव्हर्सिटी वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. असं असतानाच आता या नेहा सिंह यांचा आणखी एक कारनामा उघडकीस आला आहे.

तो म्हणजे समिटमध्ये डीडी न्यूजला मुलाखत देताना नेहा सिंह यांनी चीनी रोबोटिक डॉग प्रमाणे ज्या सॉकर ड्रोनची माहिती दिली होती आणि तो ड्रोन आमच्या गलगोटिया विद्यापीठाने तयार केल्याचा दावा करत होत्या. मात्र, तो सॉकर ड्रोन देखील आता या विद्यापीठाने तयार केला नसल्याचं समोर आलं आहे.

Robotic dog displayed at the AI Impact Summit Delhi, later identified as the Unitree Go2 model amid the Galgotias University controversy.
BJP Vs Shivsena : भाजप-शिंदेसेना कार्यकर्त्यांमध्ये तणाव! अंकुश कदमांच्या बॅनरनंतर नाईक समर्थक संतप्त

हा सॉकर ड्रोन दक्षिण कोरियाच्या एका कंपनीने विकसित केल्याची धक्कादायक माहिती समोर आल्यामुळे गलगोटिया विद्यापीठाचा खोटारडेपणा पुन्हा एकदा उघडकीस आला आहे. त्यामुळे आता गलगोटिया विद्यापीठाच्या कार्यपद्धीवर देशभरातून संशय व्यक्त केला जात आहे. शिवाय मोठ्या प्रमाणात टीकेचा सामना देखील विद्यापीठाला करावा लागत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com