Rahul Gandhi Defamation Case :  Sarkarnama
देश

Rahul Gandhi Defamation Case : 'दोन वर्षांची शिक्षा कायम राहणार की...' ; राहुल गांधींचा फैसला थोड्याच वेळात

Rahul Gandhi Gujrat High Court Case : मोदी आडनावाची बदनामी केल्याचा आरोप...

सरकारनामा ब्यूरो

National News : काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि नेते राहुल गांधी यांच्यासाठी आजचा दिवस महत्त्वाचा ठरणार आहे. मोदी आडनावाशी संदर्भाने केलेल्या विधानाप्रकरणी सुनावलेल्या शिक्षासंदर्भात आज (दि.७ ) राहुल गांधींच्या याचिकेवर सुनावणी होणार आहे. सकाळी ११ वाजता गुजरात उच्च न्यायालयात सुनावणीला सुरूवात करण्यात येणार आहे. (Rahul Gandhi Defamation Case in Gujrat high Court)

गुजरात राज्याचे भाजपचे नेते पुर्णेश मोदी यांच्याकडून काँग्रेसच्या प्रचारादरम्यान राहुल गांधी यांनी 'मोदी चोर है' अस वक्तव्य केल्यामुळे सुरत उच्च न्यायालयात त्यांच्याविरूद्ध मानहाणीचा दावा करण्यात आला होता. याच प्रकरणामध्ये राहुल गांधी यांना शिक्षा सुनावल्यामुळे राहुल गांधींनी खासदारकी गमावली होती. याविरूद्धच्या राहुल गांधी यांच्या याचिकेवर आता मोठा निकाल येणार आहे.

नेमकं काय आहे प्रकरण?

'मोदी' आडनावावर वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी राहुल गांधींवर खटला दाखल होता. सुरत जिल्हा न्यायालयाने राहुल गांधी यांना एका फौजदारी मानहानीच्या प्रकरणात दोषी ठरवले होते. यानंतर त्यांना दोन वर्षांची कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली. यामुळे त्यांच्यावर कारवाई होऊन, त्यांना संसद सदस्यावरून अपात्र करण्यात आले होते.

यानंतर भाजप आमदार पुर्णेश मोदी यांनी राहुल गांधीविरोधात गुन्हा दाखल केला होता. राहुल गांधी यांच्या वक्तव्यामुळे मोदी समाजाचा अपमान झाल्याचा दावा त्यांनी केला होता. या प्रकरणी राहुल गांधींना तीन वेळा न्यायालयात हजर राहावे लागले. त्यांनी निवडणुकीच्या सभेत विधान केल्याचे सांगितले होते. या भेटीचे व्हिडिओ रेकॉर्डिंग न्यायालयात सादर करण्यात आले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT